शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ! घराच्या अंगणात सापडला हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेला 'मास्टोडॉन'चा जबडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:34 IST

Mastodon Jaw Fossil: एवढा मोठा जबडा पाहून घराचा मालक चक्रावून गेला.

Mastodon Jaw Fossil Discovery: जगभरातील अनेक ठिकाणी प्रागैतिहासिक काळातील प्राण्यांची जीवाश्म आढळली आहेत. अशाच प्रकारची घटना अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये घडली आहे. एका व्यक्तीला त्याच्या घराच्या अंगणात 'मास्टोडॉन'(Mastodon), या प्राण्याचा जबडा सापडला आहे. बागकाम करताना हे दुर्मिळ जीवाश्म त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्याने तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.

सविस्तर माहिती अशी की, सप्टेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्कमधील एक व्यक्ती आपल्या घराच्या अंगणात बागकाम करत होता. यावेळी त्याला जमिनीत दातांसारखे काहीतरी आढळले. त्याने खोलवर खोदले असता, एक भलामोठा जबडा आणि इतर काही हाडांचे तुकडे आढळले. माहिती मिळताच, न्यू यॉर्क विद्यापीठातील संग्रहालय कर्मचारी आणि संशोधकांनी या ठिकाणी उत्खनन केले. यावेळी त्यांना मास्टोडॉनचा संपूर्ण जबडा, तसेच पायाचे आणि बरगडीचे हाड सापडले. 

संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मास्टोडॉन हा हत्तीसारखा दिसणारा प्राणी असून, आताच्या हत्तीपेक्षा आकाराने खूप मोठा होता. राज्यात आतापर्यंत मास्टोडॉनचे 150 हून अधिक जीवाश्म सापडले असून, त्यापैकी सुमारे एक तृतीयांश ऑरेंज काउंटीच्या त्याच भागात आढळले आहेत.

मास्टोडॉन 11000 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालामास्टोडॉन हा एक विशाल हत्तीसारखा सस्तन प्राणी होता, जो सुमारे 11,000 वर्षांपूर्वी नामशेष झाला. हा आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य अमेरिकेत राहायचा. मास्टोडॉन जातीची सर्वात जुनी हाडे काँगो (आफ्रिका) मध्ये सापडली असून, ती अंदाजे 40 मिलियन वर्षे जुनी आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका