शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Jara Hatke: मेट्रोच्या सीटवरून दोन महिला एकमेकींशी भांडल्या, पण सर्वांच्या नजरा तिसरीवर खिळल्या...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 21:38 IST

Jara hatke: जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे.

नवी दिल्ली -  जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. हा व्हिडीओ मेट्रो रेल्वेमधील आहे. ज्यामध्ये दोन महिला सिटसाठी भांडताना दिसत आहेत. मेट्रोमध्ये अशा घटना दररोज घडत असतात. तसेच सिटवरून हमरी तुमरी होत असते. या व्हिडीओमध्ये भांडणाऱ्या महिलांबरोबरच बाजूला बसलेली एक मुलगी दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सर्वांच्या नजरा एका तरुणीवर खिळल्या आहेत. जी या महिलांमधील भांडण एन्जॉय करत मस्त मजेत बर्गर खात आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये साडी नेसलेली एक महिला मेट्रोच्या सिटवर बॅग ठेवून बसली आहे. तिच्या बाजूला बसलेल्या तरुणीनेही सीटवर बॅग ठेवली आहे. त्यामुळे एका प्रवाशाच्या बसण्याची जागा अडली होती. अशा स्थितीत जेव्हा एका तरुणीने येऊन जागा देण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तिला जागा देण्यास नकार दिला. आमच्या सिट नाही, तुम्हाला जिथे जागा दिसते तिथे बसा, असं त्यांच्यापैकी एकीने सांगितलं. त्यानंतर ती तरुणी थोड्याशा रिकाम्या दिसणाऱ्या जागेत त्यांच्या बाजूलाच बसते. त्यानंतर त्या दोघींमध्ये पुन्हा एकदा बोलाचाल सुरू होते. साडी नेसलेली तरुणी तिला सांगते की माझ्यावर बसू नका. त्यावर दुसरी तरुणी सांगते की तुम्ही सिट आरक्षित करू शकत नाही. त्यावरून त्या दोघींमधील बोलचाल खूप वाढते. मात्र या दरम्यान, शेजारी बसलेली तरुणी अगदी आरामात बर्गर खात राहते.

हा व्हिडीओ @Wellutwt या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच त्यावर जागा नाही आहे. खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन अशी हटके कॅप्शन देण्यात आली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून, त्याला हजारो लाईक्स मिळत आहेत.  

टॅग्स :Metroमेट्रोdelhiदिल्लीJara hatkeजरा हटके