एक ६५ वर्षीय महिला मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेवेळी ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत असल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना लंडनमधील एका रुग्णालयातील आहे. शस्त्रक्रिया सुरू असताना सनई वाजवणाऱ्या या महिलेचं नाव डेनिस बेकन असं आहे. ती लंडनमधील ईस्ट ससेक्समधील क्रोबोरो येथील रहिवासी आहे. तसेच अनेक वर्षांपासून पार्किंसंस या आजाराशी झुंजत आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, मेंदूमध्ये इलेक्ट्रिक सिग्नल देताच डेनिस यांच्या बोटांच्या हालचाली सुरू झाल्या. तसेच त्यांनी त्यांचं आवडतं वाद्य क्लेरिनेट वाजवण्यास सुरुवात केली. डेनिस म्हणाल्या की, मला आठवतंय, जसं स्टिमुलेशन दिलं गेलं तसा माझा उजवा हात सहजपणे चालू लागला. मला पुन्हा क्लेरिनेट वाजवता आलं. त्यावेळी मी खूप खूश होते.
ही सर्जरी किंग्स कॉलेज रुग्णालयात झाली. तिथे प्राध्यापक कियोंमार्स अशकन यांनी चार तास चाललेल्या डीप ब्रेन स्टिमुलेशन प्रक्रियेला पूर्णत्वास नेले. यादरम्यान, डेनिस यांना पूर्णपणे बेशुद्ध करण्यात आलं नव्हतं. तर डोकं सून्न राहावं पण त्या जाग्या राहाव्यात यासाठी त्यांना केवळ लोकल एनेस्थिशिया देण्यात आला होता. जेव्हा इलेक्ट्रोड्स सक्रिय करण्यात आले, तेव्हा त्यांची बोटं सहजपणे चालू लागली. तसेच त्यांनी त्वरित क्लेरिनेट वाटवण्यास सुरुवात केली.
सर्जरी करणारे डॉक्टर प्राध्यापक अशकन यांनी सांगितले की, हा क्षण त्यांच्यासाठी खूप खास होता. जेव्हा डेनिस यांनी शस्त्रक्रियेदरम्यान ऑपरेशन टेबलवर क्लेरिनेट वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा स्टिमुलेशन योग्य दिशेमध्ये काम करत असल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्हाला रियल टाइममध्ये त्यांच्या बोटांच्या हालचाली समजण्यास मदत झाली.
Web Summary : A 65-year-old Parkinson's patient, Dennis Bacon, played the clarinet during her brain surgery in London. Doctors stimulated her brain, restoring finger movement. The surgery, performed at King's College Hospital, allowed real-time monitoring of her movements, ensuring precise electrode placement.
Web Summary : लंदन में 65 वर्षीय पार्किंसंस रोगी डेनिस बेकन ने ब्रेन सर्जरी के दौरान क्लेरनेट बजाया। डॉक्टरों ने मस्तिष्क को उत्तेजित किया, जिससे उंगली की हरकत बहाल हुई। किंग्स कॉलेज अस्पताल में हुई सर्जरी से उनके आंदोलनों की निगरानी की गई, जिससे सटीक इलेक्ट्रोड प्लेसमेंट सुनिश्चित हुआ।