शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

ऐकावं ते नवल! घणसोलीत सापडला बोलका कावळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:59 IST

पोपट,कुत्रा,मांजर आणि कबुतरे पाळण्याची अनेकांना आवड असल्याचे आपण ऐकले आहे. पण प्रत्यक्षात सर्व पक्ष्यांमध्ये चपळ आणि चतुर असलेला कावळा घरात पाळल्याचे कुठेही ऐकिवात नाही.

- अनंत पाटील नवी मुंबई -  पोपट,कुत्रा,मांजर आणि कबुतरे पाळण्याची अनेकांना आवड असल्याचे आपण ऐकले आहे. पण प्रत्यक्षात सर्व पक्ष्यांमध्ये चपळ आणि चतुर असलेला कावळा घरात पाळल्याचे कुठेही ऐकिवात नाही. इतकेच नव्हे तर तो कावळा या पक्षीमित्राशी आणि त्याच्या कुटुंबाशी प्रत्यक्षात बोलणारा असा आहे. गेल्या चार वर्षापासून स्वताच्या घरी कावळा हा पक्षी पाळणा-या  पक्षी मित्राचे नाव दिलीप दिनकर म्हात्रे असे असून तो नवी मुंबईतील घणसोली गावात  राहत आहे. या बोलक्या कावळ्याबरोबरच त्याने घार आणि पोपट सुद्धा पाळलेला आहे. अशा या पक्षीप्रेमी दिलीप म्हात्रे यांच्या घरी जावून घेतलेली ही माहिती.    ज्ञानेश्वर माउलींची "पैल तो गे काऊ कोक ताहे,शकून गे माये सांगताहे" या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तोंडून ऐकताना त्याचे देहभान हरपते.पितृपक्षात कावळय़ांना अग्रमान देण्याची कथा पुराणात आढळून येते. कावळय़ाचा संदर्भ पितरांशी जोडला गेल्याने ते अमर आहेत. तसेच पितरांपर्यंत पोहचण्यासाठीचे कावळेसुद्धा अमर आहेत असे मानले गेले. वस्तुतः कावळय़ाचे सर्वसामान्य आयुर्मान १४ ते१५ वर्षे आहे.लोकांच्या कावळ्याप्रती विविध समजूत आहेत त्यातून आपण लहानपणापासून ऐकले असेल की दारात कावळा ओरडला की पाहुणे येतात. किंवा काही लोकांप्रमाणे तर कावळा घराच्या आसपास असल्यास शोकसमाचार असल्याचीही समजूत आहे. अनेक लोकं यावर विश्वास करतात तर अनेक याला अंधविश्वास असल्याचं म्हणतात.        दिलीप म्हात्रे या तरुणाला चार वर्षापूर्वी कावळ्याचे एक लहानसे पिल्लू घणसोली खाडीकिनारी असलेल्या साईबाबा मंदिर जवळ जखमी अवस्थेत सापडला. त्याला पकडायला गेल्यानंतर सर्व कावळे एकत्रित काव काव करून जोरजोरात आरोळ्या मारू लागल्याने काही करून त्या पिल्लाचा जीव वाचवून त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु दोन महिन्यातच त्याच्यावर उपचार करून बरा झाला. सहा महिन्यानंतर पंखांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला घराबाहेर सोडले असता तो परत घरीच येऊ लागल्याने अखेर कावळा पाळण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजमितीस चार वर्षाचा कालावधी उलटूनही कावळा घरातच त्यांच्या कुटुंबासोबत राहतोय. या कावळ्याचे नाव आहे "राजा " पोपटाचे नाव "राणी" आणि घारी चे नाव "अवतार" अशी ठेवली आहेत. त्यांच्या नावाने हाक मारल्यावर हे तिन्ही पक्षी त्यांच्या हाकेला साद देतात.  आता तर दिलीप म्हात्रे यांची पत्नी गीता आणि १० वर्षाची त्यांची मुलगी तेजस्वी यांच्याशी तर हा कावळा बाय,टकल्या,राजा असे बोलतो.       दिलीप कावळ्यांचा स्पष्ट आवाज काढून दररोज गावातील खाडीकिनारी शेकडो कावळे बोलावतो. नवी मुंबई महापालिकेत घणसोली विभागात कंत्राटी सफाई कामगार म्हणून दिलीप म्हात्रे तुटपुंज्या पगाराची नोकरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. कावळ्याबरोबर त्याने चार घारींची पिल्ले आणि एक घुबड पक्षी पाळली होती.पण तीन घारी पंखांची वाढ झाल्यानंतर उडून गेल्या. आता फक्त एकच घार घरी असून ती पण दिलीप च्या परिवारात मिसळून गेलेली आहे. आता हा कावळा ,घार आणि पोपट दिलीप च्या घरात १० वर्षाच्या मुलीसोबत मनसोक्त रमले आहेत.   विषारी आणि बिनविषारी साप पकडून जंगलात सोडून देण्यात तो पटाईत आहे. उन्हाळ्यात पशु पक्ष्यांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागते त्या कालावधीत हा घराच्या गच्चीवर पाण्याचे भरलेले डबे ठेवतो. रेशनीग दुकानात पडलेले धान्य गोळा करून कबुतरांना खायला घालणे त्याची रोजची सवय आहे. म्हणून तो म्हणतो कि जीवनावर जमेल तितके प्रेम करायला शिका, माणसांप्रमाणे पशु पक्षी आणि मुक्या जनावरांवर प्रेम करण्याचा त्याने संदेश दिला आहे.

व्हिडिओ -  संदेश रेणोसे  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेNavi Mumbaiनवी मुंबई