IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 01:40 PM2018-04-17T13:40:20+5:302018-04-17T13:40:20+5:30

विराटच्या खेळीपेक्षा स्टेडिअममध्ये असलेली अनुष्का शर्माची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती.

IPL 2018: Anushka Sharma's passionate support for Virat Kohli on sidelines has become an internet meme | IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स

IPL 2018: पती-पत्नी सेम टू सेम, विराटला चिअर करतानाच्या अनुष्काच्या फोटोचे इंटरनेटवर मेम्स

Next

मुंबई- आयपीएलचे सामने दिवसेंदिवस चांगलेच रंगात येत आहेत. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु व किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीने 21 धावा केल्या. पण विराटच्या खेळीपेक्षा स्टेडिअममध्ये असलेली अनुष्का शर्माची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा स्टेडिअमवर आली होती. अनुष्काचं विराटला चिअर करणं इंटरनेटवरही चर्चेचा विषय आहे. ज्याप्रमाणे विराट मैदानावर खेळताना आक्रमक असतो अगदी त्याच शैलीत अनुष्का विराटला चिअर करत होती. 



 

विराट व अनुष्काचे त्या सामन्यातील फोटो एकत्र करून नेटिझन्सने विविध मेम्स तयार केले आहेत. मेट्रोमध्ये सीट न मिळण्यापासून ते बाहुबली सिनेमातील सीन रिक्रिएट करेपर्यंच असे विविध मेम्स नेटिझन्सने तयार केले आहेत. 



 

कॅप्टन कोहलीच्या ब्रिगेडने किंग्ज इलेव्हनने दिलेले 156 धावांचं आव्हान सहजपणे पूर्ण केलं. 19.3 ओव्हरमध्ये त्यानी आव्हान पूर्ण केलं. आरसीबीचा पहिला विजय ज्याप्रमाणे टीमने साजरा केला त्याचप्रमाणे अनुष्का शर्मानेही केला. टीम सामना जिंकताच अनुष्का स्टेडिअममध्ये उभी राहिली. 





 

Web Title: IPL 2018: Anushka Sharma's passionate support for Virat Kohli on sidelines has become an internet meme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.