शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक असं गाव जिथे कधीच पाऊस पडत नाही, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 12:38 IST

तुम्हाला अशा ठिकाणाबाबत माहीत आहे का जिथे कधीच पाऊस पडत नाही. हे ठिकाण काही वाळवंट नाही. हे एक गाव आहे तिथे लोक राहतात.

देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनने धडक दिली  आहे आणि पाऊसही सुरू आहे. हवामान खात्याकडून सतत पावसाचे अलर्ट दिले जात आहेत. काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी नाही. मात्र, जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे वर्षभर सर्वात जास्त पाऊस पडतो. जसे की, मेघालयातील मासिनराम गाव. इथे जगात सर्वात जास्त पाऊस होतो. पण तुम्हाला अशा ठिकाणाबाबत माहीत आहे का जिथे कधीच पाऊस पडत नाही. हे ठिकाण काही वाळवंट नाही. हे एक गाव आहे तिथे लोक राहतात.

कधीच पाऊस न पडणाऱ्या या यमनमधील गावाचं नाव आहे अल-हुतैब. हे गाव समुद्र सपाटीपासून ३,२०० मीटर उंचीवर आहे. गावाच्या चारही बाजूचं वातावरण मुळात फार गरम आहे. मात्र हिवाळ्यात सकाळी इथे फार थंड वातावरण असतं. पण जसाही सूर्य डोकं वर काढतो लोकांना उष्णतेचा सामना करावा लागतो.

ग्रामीण आणि शहरी विशेषत: सोबत प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेला जोडणारं हे गाव आता अल-बोहरा किंवा अल-मुकरमा लोकांचा गढ आहे. त्यांना यमनी समुदाय असंही म्हटलं जातं.

यमनी समुदायातील लोक मुहम्मद बुरहानुद्दीन यांच्या नेतृत्वातील इस्लाम समुदायातील आहेत. ते मुंबईत राहत होते. २०१४ मध्ये मृत्यू होईपर्यंत ते दर तीन वर्षांनी या दावाचा दौरा करत होते.

या गावाची खास बाब म्हणजे इथे कधीच पाऊस पडत नाही. याचं कारणंही तेवढं खास आहे. या गावात पाऊस पडत नाही कारण हे गाव ढगांच्या वर आहे. म्हणजे ढग या गावाच्या खालीच तयार होता. इतकं हे गाव उंचीवर आहे. येथील नजारा असा आहे जो दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके