शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Inspirational Story : ६०० ईमेल, ८० कॉल... अन् वर्ल्ड बँकेत नोकरी! तरुणाची संघर्षमय प्रवासाची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 07:49 IST

मेहनत कधीही व्यर्थ जात नाही आणि यशाचा कोणता शॉर्टकट नसतो, असे म्हणतात. दिल्लीच्या एसआरसीसी कॉलेजचा पदवीधर वत्सल नाहटा याने हेच सिद्ध केले आहे.

मेहनत कधीही व्यर्थ जात नाही आणि यशाचा कोणता शॉर्टकट नसतो, असे म्हणतात. दिल्लीच्या एसआरसीसी कॉलेजचा पदवीधर वत्सल नाहटा याने हेच सिद्ध केले आहे. वाईट काळातही संयम राखून त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर त्याला जागतिक बँकेत नोकरी मिळाली. त्याने हा संपूर्ण प्रवास लिंक्डइनवरील दीर्घ पोस्टमध्ये कथन केला आहे.

हा संघर्ष कोविड-१९ च्या वेळी २०२० मध्ये सुरू झाला. त्यावेळी त्याचे अमेरिकेतील येल विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण होणार होते. तो नोकरीच्या शोधात होता. पण, मंदीमुळे अनेक कंपन्या कर्मचारी कमी करत होत्या. तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कंपन्यांवर केवळ अमेरिकन कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी दबाव आणला होता. नोकरी मिळत नसल्याने येलमध्ये येऊन काय उपयोग, असा प्रश्न वत्सलला पडला.

“फोन करून आई-वडील काय करतोय असे विचारायचे, तेव्हा त्यांना उत्तर देणे कठीण झाले होते. पण भारतात परतणे हा पर्याय नाही आणि माझा पहिला पगार फक्त डॉलर्समध्ये असेल असे मनाशी ठरवले. दोन महिन्यात लिंक्डइनवर १,५०० कनेक्शन रिक्वेस्ट पाठवल्या, ६०० ईमेल लिहिले आणि ८० कॉल केले. बहुतांश ठिकाणी नकार मिळाला, तरीही हार मानली नाही,” असे वत्सलने म्हटले. ‘अखेर मे महिन्यात ४ नोकरीच्या ऑफर मिळाल्या आणि मी जागतिक बँकेची निवड केली. ते माझ्या ‘ओपीटी’(ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग) नंतर माझा व्हिसा प्रायोजित करण्यास तयार झाले, आणि माझ्या व्यवस्थापकाने मला जागतिक बँकेच्या सध्याच्या संशोधन संचालकांसोबत मशीन लर्निंग पेपरवर सह-लेखनाची ऑफर दिली”.

प्रयत्न सुरूच ठेवा, हार मानू नकाही नोकरी मिळाली तेव्हा तो २३ वर्षांचा होता. आता ३ वर्षांनी लोकांनी हार मानू नये हे सांगण्यासाठी त्याने आपला संघर्ष पोस्टद्वारे मांडला. “तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल आणि जग तुमच्या विरोधात आहे, असे वाटत असेल तरी, प्रयत्न सुरूच ठेवा... जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत असाल आणि पुरेसे दरवाजे ठोठावले तर चांगले दिवस नक्कीच येतील,” असे त्याने अखेरीस लिहिले. वत्सल नाहटा

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीWorld Bankवर्ल्ड बँकIndiaभारत