शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! लग्नाच्या 10 महिन्यांनंतर झाला 'पती'चा भांडाफोड, पुरूष नाही तर महिला निघाला पती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:01 IST

Woman Discovers Husband is Actually a Woman : लग्नानंतर महिलेला काही महिन्यांपर्यंत आरोपी महिला फसवत राहिली. आतापर्यंत नवरी सासरच्या लोकांना फसवून लुटत असल्याच्या घटना समोर येत होत्या.

Woman Discovers Husband is Actually a Woman : जगभरात एकापेक्षा एक आश्चर्यकारक घटना घडत असतात. लग्नासारख्या पवित्र नात्यातही आजकाल खूप फ्रॉड बघायला मिळत आहेत. असे असे किस्से समोर येतात की, हैराण व्हायला होतं. इंडोनेशियातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे महिलेला लग्नाच्या 10 महिन्यांनंतर समजलं की, ज्याच्यासोबत पुरूष समजून तिने लग्न केलं, तो  मुळात महिला आहे.

डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, लग्नानंतर महिलेला काही महिन्यांपर्यंत आरोपी महिला फसवत राहिली. आतापर्यंत नवरी सासरच्या लोकांना फसवून लुटत असल्याच्या घटना समोर येत होत्या. पण इथे आरोपी महिलेने पूर्ण परिवाराला आणि नवरीलाही 10 महिने अंधारात ठेवलं. 

आरोपी महिलेचं नाव Erayani आहे. तर पीडित महिलेच्या नावाचा खुलासा केलेला नाही. Erayani ने 3 महिन्यांच्या बोलणीनंतर पीडित महिलेसोबत लग्न केलं आणि तिच्याच घरात राहू लागला. प्रेमात पडलेल्या पत्नीला आपल्या पतीवर म्हणजे Erayani वर संशयही आला नाही. पण तिच्या आई-वडिलांना काहीतरी गडबड वाटली. Erayani ना नोकरीबाबत काही सांगत होती ना काही मोकळेपणाने बोलत होती. यादरम्यान ती नेहमीच पीडित महिलेकडे पैसे मागत होती. जेव्हा महिलेच्या घरातील लोकांचे प्रश्न वाढू लागले तेव्हा आरोपी महिला पीडित महिलेसोबत दुसरीकडे शिफ्ट झाली. दोघे सोबत राहू लागले.

आरोपी महिला Erayani ने पीडित महिलेला परिवारापासून दूर केलं. तिला घरात कैद करून ठेवलं आणि तिला कुणासोबतही बोलू देत नव्हती. अखेर महिलेच्या परिवाराने पोलिसांना याची माहिती दिली आणि हे पूर्ण प्रकरण समोर आलं. पोलिसांनी काही वेळातच Erayani ला शोधून काढलं. तेव्हा सगळेच हैराण झाले. ज्या Erayani ला पीडित महिला पती समजत होती ती तर महिला निघाली आणि तिने फसवणूक करून लग्न केलं होतं. 10 महिन्यात तिने 15 लाखांपेक्षा जास्त पैसे घेतले होते. पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Indonesiaइंडोनेशियाmarriageलग्नfraudधोकेबाजी