Interesting Facts : भारताच्या प्रत्येक शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दल दिवसरात्र मेहनत घेत असतं. कुठेही काही घटना घडली की, आधी पोलिसांना माहिती दिली जाते. पोलिसांची ओळख त्यांचा खाकी रंगाचा गणवेश असतो. सामान्यपणे देशभरात सगळीकडे पोलिसांना खाकी रंगाचाच गणवेश असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये पोलिसांचा गणवेश वेगळ्या रंगांचा असतो. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, भारतात एक असं शहर आहे जिथे पोलिसांचा गणवेश हा खाकी रंगांचा नाही तर पांढऱ्या रंगाचा असतो. आता हे शहर कोणतं आहे आणि तेथील पोलीस पांढऱ्या रंगाचा गणवेश का घालतात हे आपण जाणून घेणार आहोत.
पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच का?
भारतात पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकीच असण्याची कारणं वेगवेगळी असतात. याचं एक ऐतिहासिक कारण जाणून घेऊ. जेव्हा भारतात इंग्रजांचं राज्य होतं, तेव्हा पोलीस पांढरा गणवेशच घालत होते. पण पांढरे कपडे लवकर मळकट होऊ लागल्याने चहा पावडरचं पाणी किंवा कॉटन फॅब्रिकने हे कपडे धुण्यात येत होते. जे दिसायला खूप वेगळे दिसत होते आणि पोलिसांना आवडतही होते. त्याशिवायही काही कारणं आहेत.
खाकी रंग हा पोलिसांना वनात, जंगलात किंवा झाडी-झुडपांमध्ये लपण्यासाठी मदत करतो. असं मानलं जातं की, खाकी रंग पोलीस कर्मचाऱ्यांना अनुशासित आणि कडक प्रतिमा देण्यास मदत करतो. हॅरी लॅंडसनने १८४७ मध्ये या रंगाला पोलिसांच्या गणवेशाच्या रूपात स्वीकारलं होतं. तेव्हापासून हाच रंग वापरला जातो.
पोलिसांच्या गणवेशात दोरी का असते?
आपण पाहिलं असेल की, पोलिसांच्या गणवेशात खांद्यावर एक दोरी दिलेली असते. या दोरीला 'लॅनयार्ड' म्हटं जातं. ही दोरी खांद्यापासून खिशापर्यंत असते आणि खिशात दोरीच्या टोकाला एक शिटी बांधलेली असते. भारतीय सैन्याच्या गणवेशातही अशी दोरी असते. डीएसपी किंवा एसएसपी या रॅंकच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर लॅनयार्ड काळ्या रंगाची असते.
पांढरा गणवेश कुठे घातला जातो?
भारतात केवळ एकाच ठिकाणी पोलिसांच्या गणवेशाचा रंग हा पांढरा असतो. ते ठिकाण म्हणजे कोलकाता. इथे हा रंग निवडण्यात आला कारण येथील उष्ण वातावरण आणि वेगळी हवा. हा गणवेश राज्य पोलिसांना एक वेगळी ओळख देतो.
कोलकातामध्ये जेव्हा ब्रिटिश शासन होतं, तेव्हा १८४५ मध्ये इंग्रजांनी इथे पोलीस दल तयार केलं होतं. पोलिसांच्या गणवेशाबाबत झालेल्या चर्चेत रंग पांढरा ठरवण्यात आला. १८५७ मध्ये हॅरी लॅंडसनने कोलकाता पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण कोलकाताने तो फेटाळला. यामागे कारण येथील दमट वातावरण देण्यात आलं. वातावरणामुळे गणवेशासाठी पांढरा रंग फायदेशीर मानला गेला.
Web Summary : Unlike the standard khaki, Kolkata police wear white uniforms due to the humid climate. This unique choice, dating back to British rule in 1845, distinguishes them, prioritizing comfort in the local weather.
Web Summary : कोलकाता पुलिस खाकी के बजाय सफेद वर्दी पहनती है, क्योंकि यहाँ की जलवायु नम है। यह अनोखा विकल्प 1845 में ब्रिटिश शासन के समय से चला आ रहा है, जो स्थानीय मौसम में आराम को प्राथमिकता देता है।