Interesting Facts : देशात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. जास्तीत जास्त लोकांची पसंती रेल्वेच्या प्रवासालाच असते. कारण हा प्रवास स्वस्तही असतो आणि आरामदायकही असतो. सोबतच रेल्वेचा प्रवास एक वेगळा अनुभव देणारा सुद्धा असतो. लांबचा प्रवास देखील आरामदायी होतो. भारतात रेल्वेचं जाळं आणखी वाढलं आहे. देशातील रेल्वे सेवा जगातील चौथी सगळ्यात मोठी रेल्वे सेवा आहे. रेल्वेमध्ये अनेक आधुनिक बदल केले जात आहेत. जेणेकरून लोकांना अधिक सुविधा मिळाल्या आणि त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. पण लोकांना रेल्वेबाबत अजूनही बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनची काही ना काही खासियत आहे. ज्यांची नेहमीच चर्चा होत असते. पण आपल्याला हे माहीत आहे का की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात विभागलं गेलं आहे. ते कोणतं स्टेशन हे जाणून घेऊ.
कोणतं स्टेशन दोन राज्यात विभागलं?
देशात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. पण देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे, जे दोन देशात विभागलेलं आहे. म्हणजे ते अर्ध दुसऱ्या राज्यात आणि अर्ध वेगळ्या राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे नवापुर रेल्वे स्टेशन. हेच ते रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभागलं गेलं आहे. या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे, उरलेला अर्धा भाग गुजरातच्या तापीमध्ये आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं ट्वीट
देशातील या वेगळ्या रेल्वे स्टेशनबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली. त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट २०२० मध्ये केली. त्या पोस्टमध्ये या स्टेशनचा आणि स्टेशनवरील बेंचचा एक फोटो आहे. हा बेंच दोन राज्यात विभागला आहे. सोबतच त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, हे रेल्वे स्टेशन सूरत - भुसावळ मार्गावर आहे. या स्टेशनचा अर्धा भाग गुजात तर अर्धा भाग महाराष्ट्रात आहेत.
रेल्वे स्टेशन नसलेलं एकुलतं एक राज्य
देशातील सिक्कीम हे एक असं राज्य आहे जिथे रेल्वे धावत नाही आणि ना इथे कोणती रेल्वे लाइन आहे. हे देशातील एकुलतं एक असं राज्य आहे, जिथे रेल्वे नेटवर्क आजपर्यंत पोहोचलेलं नाही. पण सिक्कीम रेल्वे लाइनचं काम जोरात सुरू आहे. सिवोक–रांगपो रेल्वे प्रकल्प हा येथील मुख्य प्रकल्प आहे. ज्यामुळे सिक्कीम प्रथमच भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल. हा प्रकल्प जवळपास ४४.९६ किमी लांब आहे.
हा रेल्वे प्रकल्प आता अधिक आव्हानात्मक भूप्रदेशातून बनवला जात आहे. अनेक भुयारं, पुलं आणि इंजिनिअरिंग कार्य आवश्यक आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट सिक्कीममधील रांगपो ला प्रथम रेल्वे स्टेशन बनवण्याचं आहे. सध्याच्या माहितीनुसार, प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षित वेळ २०२७ पर्यंत आहे, आणि त्यानंतरच सिक्कीममध्ये रेल्वे सेवा वास्तवात सुरू होईल अशी शक्यता आहे.
भारतात किती रेल्वे स्टेशन?
अनेक राज्यातील गावा-खेड्यांमध्ये रेल्वे थांबते. अनेक छोटे छोटे रेल्वे स्टेशन नेहमीच चर्चेत असतात. देशात एकूण ७ हजार ३०० पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. भारतात रोज १३ हजार ते १४ हजार प्रवासी रेल्वे आणि ९ हजार मालगाड्या धावतात. म्हणजे एकूण रोज २० हजारांच्या आसपास रेल्वे धावतात. ज्या ७ हजार ३०० स्टेशन कव्हर करतात. इतकंच नाही तर भारतात रोज साधारण २.४ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. इतका मोठा आवाका असूनही देशात एक असं राज्य आहे, जिथे अजिबात रेल्वे पोहोचलेली नाही.
Web Summary : Navapur Railway Station uniquely sits between Maharashtra and Gujarat. Half the station is in Nandurbar district, Maharashtra, the other in Tapi, Gujarat. Sikkim remains the only Indian state without a railway network, though construction is underway.
Web Summary : नवापुर रेलवे स्टेशन महाराष्ट्र और गुजरात के बीच स्थित है। स्टेशन का आधा भाग महाराष्ट्र के नंदुरबार जिले में और दूसरा आधा गुजरात के तापी में है। सिक्किम भारत का एकमात्र राज्य है जहाँ रेलवे नेटवर्क नहीं है, हालाँकि निर्माण जारी है।