शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

या महिलेने केले पाच भावांशी लग्न, काय आहे असं करण्याचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 16:52 IST

हिमाचल प्रदेशमध्ये ही प्रथा आजही पाळली जाते. या प्रथेतून लग्न केलेल्या 'रजो' ची ही कहाणी आहे. 

महाभारतात ज्याप्रमाणे द्रोपदीने पाच पांडवांसोबत लग्न केले होते हे तुम्हाला माहीत आहे. याचप्रमाणे आजच्या काळातही एका महिलेने पाच भावांशी लग्न केलंय. हिमाचल प्रदेशमध्ये ही प्रथा आजही पाळली जाते. चला जाणून घेऊया या आगळ्यावेगळ्या लग्न प्रथेबाबत...

देहरादूनपासून काही अंतरावर असलेल्या एका गावात 21 वर्षीय रजोने पाच भावांशी लग्न केले. रजोने 2013 मध्ये या पाच भावांशी लग्न केले होते. अशाप्रकारे बहु पती प्रथा ही या भागात अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अनेकांसाठी ही प्रथा विचित्र असेल पण हिमाचल आणि तिबेटमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी हे नवीन नाहीये. येथील परंपरेनुसार येथील मुलींना पतीच्या भावांसोबत लग्न करावं लागतं. 

या भागात एकाच महिलेसोबत लग्न करण्याची प्रथा सुरु होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या भागात महिलांची संख्याही कमी आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात ही प्रथा आजही आहे. 

यानुसारच रजोने पाच भावांशी लग्न केलंय. रजो आता काही मुलांची आई आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या मुलांचा वास्तविक पिता कोण आहे हे कुणालाही माहीत नाही. या परिवारात यावरुन कोणते वादही होत नाही. रजो आपल्या पाचही पतींसोबत आनंदी आहे. त्यासोबतच पाचही भाऊ रजोवर खूप प्रेम करतात. रजोला ही प्रथा बालपणापासून माहीत होती. कारण तिच्या आईचेही तीन पती होते. रजो आनंदी आहे कारण तिला तीन पतींचं प्रेम मिळतं. 

कसं चालतं वैवाहिक जीवन?

लग्नानंतरचं वैवाहिक जीवन इथे एका टोपीवर निर्भर करतं. समजा लग्नानंतर कोणताही एक भाऊ पत्नीसोबत एकांतात असेल त्यावेळी खोलीबाहेर दरवाज्यावर एक टोपी ठेवतो. हे सगळे भाऊ मान मर्यादेचं इतकं भान ठेवतात की, दरवाज्यावर टोपी दिसली की जर कुणीही खोलीच्या आत जात नाहीत. घराची प्रमुख असते महिला

येथील एक खास बाब म्हणजे इथे पुरुष नाहीतर महिला घरातील प्रमुख असतात. त्यांच्याकडे पती आणि मुलांची योग्यप्रकारे काळजी घेण्याची जबाबदारी असते. पत्नीला इथे गोयने असं म्हटलं जातं तर पतीला गोर्तेस म्हणतात.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न