शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील असं ठिकाण जिथे लग्नात अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून घेतली जाते सप्तपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 11:52 IST

Indian Unique Wedding Ritual :जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात.  मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात. 

Indian Unique Wedding Ritual : आपल्या देशात वेगवेगळ्या संस्कृती, प्रथा, कला, जात-धर्म, भाषा आहेत. म्हणूनच वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा बघायला मिळतात. हेच लग्नांबाबतही आहे. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रथा बघायला मिळतील. पण जास्तीत जास्त ठिकाणी लग्नात नवरी-नवरदेव अग्निला साक्षी मानून सप्तपदी घेताना दिसतात.  मात्र, भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लोक अग्निला नाही तर पाण्याला साक्षी मानून लग्नाचे सगळे रिवाज पूर्ण करतात. 

कुठे आहे ही अनोखी प्रथा?

ही परंपरा छत्तीसगढ़च्या बस्तरमधील आदिवासी समाजात पाळली जाते. येथील आदिवासी समाज नेहमीपासून निसर्गाची पूजा करतात. त्यांचं असं करण्यामागचं कारणही फारच इन्स्पायरिंग आहे. ते हे असं लग्नात होणारा विनाकारणाचा खर्च रोखण्यासाठी असं करतात. ही परंपरा फार आधीपासून पाळली जाते.

छत्तीसगढ़च्या धुरवा समाजात पाण्याला फार महत्व आहे. पाणी त्यांच्यासाठी देवासारखं आहे. त्यामुळे ते केवळ लग्नातच नाही तर सगळ्याच शुभ कार्यांमध्ये पाण्याला साक्षी मानून रिवाज पार पाडतात. धुरवा समाजातील लोक मूळचे बस्तरचे राहणारे आहेत. त्यांचे पूर्वज कांकेर घाटी राष्ट्रीय उद्यानाजवळ राहत होते. ते सुद्धा कांकेर नदीचं पाणी शुभ कार्यांसाठी वापरत होते. 

पूर्ण गाव नवरी-नवरदेवासोबत घेतात सप्तपदी 

बस्तरमध्ये राहणारे आदिवासी लोक जुन्या मान्यतांना खूप महत्व देतात. त्यामुळेच ते सगळ्या शुभ कार्यांमध्ये झाड आणि पाण्याची पूजा करतात. इथे लग्नात केवळ नवरी-नवरदेवच नाही तर गावातील सगळे लोक सप्तपदी घेतात. या लग्नांमध्ये नाले, तलावव, नदी, काही झाडातील आणि विहिरीच्या पाण्याचा वापर होते. या पाण्याला लोक देव मानतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न