शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सिंग इज किंग! एकत्र ६ Rolls-Royce कार खरेदी करणारी कोण आहे ही व्यक्ती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 3:36 PM

बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे ही कार आहे. तेही त्यांच्याकडे ही एकच कार असेल. पण परदेशातील एका भारतीयाने असा काही कारनामा केलाय की, कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

वेगवेगळ्या कारची आवड असणाऱ्या लोकांना Rolls-Royce कार काय चीज आहे हे चांगलंच माहीत आहे. ही महागडी लक्झरी कार फार जास्त श्रीमंत लोक खरेदी करतात. बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे ही कार आहे. तेही त्यांच्याकडे ही एकच कार असेल. पण परदेशातील एका भारतीयाने असा काही कारनामा केलाय की, कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. एका भारतीयाने सहा Rolls-Royce कार एकत्र खरेदी केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या व्यक्तीकडे आता Rolls-Royce च्या १५ कार झाल्या आहेत.  

एकदाच जवळपास ५० कोटी रूपये खर्च करून Rolls-Royce कारचा ताफा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव रूबेन सिंह आहे. लक्झरी आणि एसयूव्ही कार्सच्या या ताफ्यात ३ 3 Phantoms आणि 3 Cullinans मॉडलचा समावेश आहे. खास बाब ही आहे की, या कार्स पोहोचवण्यासाठी स्वत: Rolls-Royce चे सीईओ Torsten Muller-Otvos हे आले होते.  

रूबेन सिंह हे ब्रिटनचे प्रसिद्ध Entrepreneur आहेत. ते  alldayPA आणि Isher Capital चे सीईओ सुद्धा आहेत. त्यांना ब्रिटनचे बिल गेट्स असेही म्हटले जाते. तुम्हाला आठवत असेल तर गेल्यावर्षी एक सरदारजी त्यांच्या पगडीच्या वेगवेगळ्या रंगाच्या  Rolls-Royce कार ७ दिवस चालवल्याने चर्चेत आले होते. हे तेच सरदारजी आहेत. 

एका इंग्रजाने त्यांच्या पगडीचा अपमान केला होता. त्यांच्या पगडीची तुलना त्या व्यक्तीने बॅंडेजसोबत केली होती. त्यामुळे पंजाबी लोकांची शान आणि पगडीचं महत्त्व दाखवण्यासाठी त्यांनी त्या इंग्रजाला एक आव्हान दिलं होतं. त्यांनी या इंग्रजाला आव्हान देत म्हटले होते की, ७ दिवस ७ वेगवेगळया रंगाच्या Rolls-Royce कार चालवू शकतो. त्यांनी तसंच केलं होतं.

केवळ रूबेन सिंह नाही तर आणखी एका भारतीय व्यक्तीचं नाव Rolls-Royce सोबत जुळलेलं आहे. ती व्यक्ती होती अलवरचे महाराजा जयसिंह. त्यांचाही कारनामा चांगलाच लोकप्रिय आहे. झालं असं होतं की, राजा जय सिंह साध्या वेशात Rolls-Royce कारच्या शोरूममध्ये गेले होते. तेथील सेल्समनने त्यांना एक सामान्य भारतीय माणूस समजून दुर्लक्ष केलं होतं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी राजा दय सिंह यांनी लंडनहून ५ Rolls-Royce कार मागवल्या होत्या. या पाचही कार त्यांनी कचरा उचलण्याच्या कामी लावल्या होत्या. त्यानंतर कंपनीची बरीच बदनामी झाली होती. जेव्हा कंपनीने लिखित स्वरूपात माफी मागितली तेव्हा राजा जय सिंह यांनी कारने कचरा उचलणे बंद केलं. 

टॅग्स :Rolls-Royceरोल्स-रॉईसLondonलंडनcarकार