भारतीय असल्याने पबमध्ये प्रवेश नाकारला
By Admin | Updated: July 27, 2015 14:49 IST2015-07-27T01:20:00+5:302015-07-27T14:49:15+5:30
भारतीय असल्याचे कारण पुढे करत मुंबईतील एका पबमध्ये ़़युवक-युवतीला प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक

भारतीय असल्याने पबमध्ये प्रवेश नाकारला
मुंबई : भारतीय असल्याचे कारण पुढे करत मुंबईतील एका पबमध्ये ़़युवक-युवतीला प्रवेश नाकारण्यात
आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जुहूतील हॉटेल सी प्रिन्सेसमधील ट्रायलॉजी क्लबमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्चभू्र वर्गीयांतील मंडळी, महाविद्यालयीन तरुण-तरुणींची नेहमी वर्दळ असणाऱ्या ट्रायलॉजी क्लबमध्ये नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी एक युवक (अनिकेत चव्हाण) आणि युवती आले असता त्यांना ‘इंडियन्स नॉट अलाऊड’ असे म्हणत प्रवेशापासून रोखले. व्यवस्थापक व सुरक्षारक्षकांनी वारंवार विनंती करुनही त्याकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे याबाबत चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकाराची माहिती घेण्यात येत असून अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)