कार्ला लेण्यांवर असुविधा

By admin | Published: May 22, 2014 06:15 AM2014-05-22T06:15:31+5:302014-05-22T11:59:10+5:30

कार्ला गडावरील लेणी पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना भारतीय पुरातत्त्व विभागाकडून सुविधा पुरविण्यात येत नाहीत.

Inconvenience on carla sowing | कार्ला लेण्यांवर असुविधा

कार्ला लेण्यांवर असुविधा

Next

लोणावळा : कार्ला गडावरील लेणी पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना भारतीय पुरातत्त्व विभागाकडून सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुविधांचा वानवा पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे बंद असलेल्या लेण्यांची तिकिटे फ ाडत पुरातत्त्व विभाग पर्यटकांची दिशाभूल करत आहे़ मावळात अनेक प्राचीन शिल्पकला दर्शविणार्‍या लेण्या, तसेच किल्ले आहेत़ या सर्व लेण्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येतात़ गडावर येताना अनेक ठिकाणी पायर्‍या तुटलेल्या आहेत, असे असताना त्या प्राचीन वास्तूंचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग काहीही उपाययोजना करीत नसल्याने ही शिल्प व वास्तू कालवश होऊ लागल्या आहेत़ भाजे लेणीवर अशीच स्थिती आहे़ दोन्ही लेण्यांवर पर्यटनांसाठी येणार्‍या पर्यटकांच्या सोईसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी याची सुविधा पुरातत्त्व विभागाने केलेली नाही़ पूर्वी या ठिकाणी शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. मात्र सुविधांची वानवा भासत असल्याने येथील पर्यटकांची संख्या घटली आहे़ कार्ला गडावर सुप्रसिद्ध एकवीरा देवीचे मंदिर आहे. पर्यटकांप्रमाणे लाखो भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येतात. या ठिकाणी काम पाहणारे श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र पुरातत्त्व विभाग यातही आडकाठी टाकत असल्याने येथील विकास पूर्णपणे खुंटला आहे़ पुरातत्त्व विभाग स्वत: काही करूशकत नसेल, तर किमान इतरांना आडकाठी तरी करू नका, असे बोलण्याची वेळ आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Inconvenience on carla sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.