शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

विमानात स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी, मग तरी टॉयलेटमध्ये का असतो Ashtray? जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:44 IST

Ashtray In Airplane Toilet : मुख्य मुद्दा असा आहे की, जर विमानात स्मोकिंग करण्यास मनाई असते तर मग विमानाच्या टॉयलेटमध्ये अ‍ॅशस्ट्रे का असतो?

Ashtray In Airplane Toilet : तुम्ही कधी विमानात बसले असाल किंवा नसालही, पण तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की, विमान सिगारेट ओढण्यास मनाई आहे. इतकंच नाही तर असं कुणी केल्यास व्यक्तीला तुरूंगाची हवा देखील खावी लागू शकते. मात्र, मुख्य मुद्दा असा आहे की, जर विमानात स्मोकिंग करण्यास मनाई असते तर मग विमानाच्या टॉयलेटमध्ये अ‍ॅशस्ट्रे (Ashtray) का असतो? अनेकांना हा प्रश्न पडत असेल, पण सगळ्यांनाच याचं उत्तर माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय सांगतो नियम?

जगभरातील सगळ्याच एअरलाईन्सच्या विमानांमध्ये स्मोकिंग करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. १९८० दरम्यान बऱ्याच एअरलाइन्सनी स्मोकिंगवर बंदी घातली होती. २००० सालापर्यंत हा नियम सगळीकडे लागू करण्यात आला. जर हा नियम कुणी मोडला तर त्यांना दंड भरावा लागतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाते. 

मग अ‍ॅशट्रेचं काय काम?

आता बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की, विमानाच्या टॉयलेटमध्ये अ‍ॅशस्ट्रे लोकांना चोरून स्मोकिंग करण्यासाठी लावला जात असेल. पण असं अजिबात नाहीये. हा अ‍ॅशस्ट्रे विमानातील टॉयलेटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने लावला जातो. आंतरराष्ट्रीय विमान नियमांनुसार प्रत्येक कमर्शिअल फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये एक अ‍ॅशस्ट्रे असणं बंधनकारक आहे. भलेही स्मोकिंगची परवानगी नसो.

सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा

नियम तयार करणारे असं मानून चालतात की, कितीही कठोर नियम का असेना, पण एखादा प्रवासी असा असतो जो लपून स्मोकिंग करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर कुणी असं केलं आणि त्याला सिगारेट विझवण्यासाठी जागा मिळाली नाही तर ती व्यक्ती सिगारेट कुठेही फेकू शकते. जसे की, कचऱ्याचा डबा.

कचऱ्याच्या डब्यामध्ये भरपूर टिशू पेपर आणि इतरही आग पकडणाऱ्या गोष्टी असतात. अशात जर कुणी पेटलेली सिगारेट त्यात टाकली तर आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. अर्थातच विमानात आग लागणं सगळ्यात भयानक आपात स्थितींपैकी एक आहे.

हाच तो धोका आहे ज्यापासून बचाव करण्यासाठी विमानाच्या वॉशरूममध्ये अ‍ॅशस्ट्रे दिलेला असतो. याचा उद्देश हा असतो की, जर एखाद्या प्रवाशानं नियम तोडून सिगारेट ओढली तर त्याच्याकडे ती विझवण्यासाठी जागा असावी. जेणेकरून आग लागण्याचा धोका टाळता यावा. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सairplaneविमानJara hatkeजरा हटके