शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Husband Wife: पती म्हणाला- तुझ्यामुळे गर्लफ्रेंड माझ्यावर चिडते; पत्नीने गाठलं पोलीस स्टेशन अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:36 IST

एका तरूणीमुळे जोडप्याच्या नात्यात आला दुरावा

Husband Wife and Girlfriend: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. जिथे एका तरूणीमुळे पती-पत्नीच्या अंतर आले आणि संपूर्ण प्रकरण इतकं गंभीर झालं की पत्नीला थेट पोलिसांकडे जावं लागलं. हे सारं त्यावेळी घडलं जेव्हा पतीने उघडपणे पत्नीला सोडण्याची धमकी दिली आणि सांगितले की तिच्यामुळे त्याची गर्लफ्रेंड त्याच्यावर चिडली. खरे तर हे संपूर्ण प्रकरण आग्र्यात घडले. आग्रामध्ये ताजमहाल हे पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतिक मानले जाते पण त्याच जिल्ह्यात असा प्रकार घडल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग्रा जिल्ह्यातील एका भागातील एक महिला आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. तिचा नवरा तिच्याशी कसा वाईट वागतो आणि त्याने आपल्या गर्लफ्रेंडसाठी तिला सोडावेसे वाटते हे देखील तिने सांगितले.

नक्की काय म्हणाला नवरा...

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे चार वर्षांपूर्वी गुजरातमधील जामनगर येथील एका तरुणाशी लग्न झाले होते, मात्र काही वेळातच तिच्या पतीने तिला सांगितले की, तू माझी पार्टनर म्हणून योग्य नाहीस. माझ्या घरातल्या लोकांनी आणि कुटुंबीयांनी सांगितले म्हणून मला तुझ्याशी लग्न करावे लागले. पण माझी एक गर्लफ्रेंड आहे. महिलेचे म्हणणे आहे की, पतीने तिला कधीही फिरायला घराबाहेर नेले नाही. तिने कधीही बाहेर जायचे प्लॅनिंग केले तर तो टाळाटाळ करत असायचा. अखेर पत्नीने पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांत तक्रार केल्यावर पुढे काय घडले?

नवरा पत्नीला म्हणायची की माझ्या गर्लफ्रेंडला तुझा आणि आपल्या लग्नाचा राग येतो. त्यामुळे महिलेने असा आरोप केला आहे की पतीकडून तिची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने अनेक दिवस अन्न-पाणी सोडले आहे. तिच्या पतीने कधीही पती-धर्म पाळला नसल्याने ती खूप एकटी पडल्याचेही तिने म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनचे प्रभारी सांगतात की हुंडाबळीसाठी छळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेhusband and wifeपती- जोडीदारmarriageलग्नGujaratगुजरातagra-pcआग्रा