शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कमाल! पत्नीला घटस्फोट देऊन पती झाला मालामाल, मिळणार 66 कोटी रूपये; पत्नी दरवर्षी देणार 61 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:20 IST

सामान्यपणे पतीच घटस्फोटानंतर पत्नीला पैसे देतात. पण एक या उलट घटना समोर आली आहे. एक पत्नी आपल्या पतीला मोठी रक्कम देणार आहे.

अब्जाधीश लोकांच्या घटस्फोटांच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. कुणी पत्नीला पोटगी म्हणून अब्जो रूपये दिले तर कुणी कोट्यावधी रूपये. काही वर्षाआधी जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेजोस यांनी पत्नी घटस्फोट दिल्यावर 38 अब्ज डॉलर म्हणजे 2.6 लाख कोटी रूपये दिले होते. सामान्यपणे पतीच घटस्फोटानंतर पत्नीला पैसे देतात. पण एक या उलट घटना समोर आली आहे. एक पत्नी आपल्या पतीला मोठी रक्कम देणार आहे.

ही घटना लंडनच्या एक उद्योगपती घराण्यातील आहे. लुईस बॅकस्ट्रॉम आणि मार्टिन वेनबर्ग यांचं लग्न सहा वर्षाआधी झालं होतं. प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा वेनबर्ग म्हणाला की, त्याला 4 अब्ज रूपये हवेत. यासाठी त्यांनी वेगवेगळे तर्क दिले. पत्नीच्या कंपनीत काम करण्याचाही हवाला दिला. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली. तरीही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लेस्ली सॅमुअल्स म्हणाले की, लग्नाच्या आधीच्या अटींनुसारच पैसे द्यावे लागतील.

किती आहे पत्नीकडे संपत्ती?

कोर्टाने बॅकस्ट्रॉमला आदेश दिला की, तिने वेगळा राहत असलेल्या पतीला 6.5 मिलियन पाउंड म्हणजे साधारण 66 कोटी रूपयांचं पॅकेज द्यावं. सोबतच त्याला रोजच्या खर्चासाठी 60 हजार पाउंड म्हणजे साधारण 61 लाख रूपये दरवर्षी त्याला देत रहावे. 

दरम्यान जेव्हा लग्न झालं तेव्हा बॅकस्ट्रॉम बिल्टिमा फाउंडेशनची अध्यक्ष होती.  बिर्गमा होल्डिंग्स (हॉंगकॉंग) लिमिटेडमध्येही तिचे शेअर होते. या दोन्ही कंपन्या तिच्या आजोबांनी सुरू केल्या होत्या. सध्या तिच्याकडे जवळपास 25 अब्ज रूपयांची संपत्ती आहे. तर वेबवर्गची संपत्ती केवळ 2 कोटी रूपये होती.

सामान्य नव्हतं नातं

कोर्टाने सांगितलं की, दोघांचं लग्न झालं होतं. पण त्यांचं नातं सामान्य नव्हतं. दोघेही वेगवेगळे राहत होते. वेगवेगळ्या पार्ट्यांना जात होते. न्यायाधीश म्हणाले की, वेनबर्ग असा कोणताही पुरावा सादर केला नाही की, त्याची संपत्ती तेव्हा इतकी जास्त होती की, इतक्या पैशांचा तो दावा करू शकेल. त्याने त्याच्या आर्थिक स्थितीचाही खुलासा केला नाही. पुन्हा पुन्हा माहिती मागूनही त्याने दिली नाही. बॅकस्‍ट्रामने हा कोर्टाचा अपमान मानत त्याला शिक्षा देण्याचीही मागणी केली होती.

टॅग्स :LondonलंडनDivorceघटस्फोटJara hatkeजरा हटके