शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

तंत्रज्ञानाची किमया! माणसांचं आयुष्य वाढवण्यासाठी केला रिसर्च, मेंदूबाबत NGO चा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:39 IST

Human Brain : मानवाचा मेंदू दीर्घ काळ जिवंत ठेवण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे.

नवी दिल्ली - विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे, की आता मानव अमर होण्यासाठी देखील विविध प्रकारचं संशोधन करण्यात येत आहे. अद्याप मानवी शरीराला अमरत्व (Eternity of Human Life) मिळालेलं नाही. परंतु मानवाचा मेंदू दीर्घ काळ जिवंत ठेवण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे. रशियन अब्जाधीश दिमित्री इत्स्कोव (Dmitry Itskov) हे एका एनजीओच्या माध्यमातून मेंदूबाबतच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. 

‘2045 Initiative’असं या एनजीओचं नाव आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे, की माणसाच्या मृत्यूनंतरही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याच्या शरीराचं एका अ‍ॅपच्या स्वरूपात डिजिटल बॉडीमध्ये रूपांतर केलं जाईल आणि मेटाव्हर्स टेक्नॉलॉजीच्या (Metaverse Technology) माध्यमातून मानवी मेंदू त्या शरीरात जाऊन वर्षानुवर्षं जिवंत राहील. या अनोख्या प्रकल्पासाठी मानवाला त्याचा मेंदू मेटाव्हर्सवर अपलोड करावा लागेल.

मॉस्कोचे रशियन अब्जाधीश दिमित्री इत्स्कोव यांनी 2045 पर्यंत त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, दिमित्री म्हणतात, की त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जायचं आहे की नाही, हे माणसं ठरवू शकतील. जेव्हा त्यांचं जैविक शरीर मरण्यास सुरुवात होईल तेव्हा या संकल्पनेद्वारे ते त्यांच्या मेंदूची डिजिटल प्रत तयार करू शकतील. ही डिजिटल प्रत सायबर स्पेसमध्ये जिवंत राहू शकेल. या प्रक्रियेला माइंड अपलोडिंग असं म्हटलं जाईल.

इत्स्कोव्ह प्रथमच मेंदू आणि संगणक जोडण्याच्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत असे नाही. यापूर्वीच टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची न्यूरालिंक नावाची कंपनीही यावर संशोधन करत आहे. यामध्ये संपूर्ण मेंदू सायबरमध्ये अपलोड केल्यानंतर बसून विचार करत असतानाच काम होत जाईल. सध्या इत्स्कोव्ह यांचं तंत्र मेटाव्हर्समध्ये मानवी मेंदू अमर करण्याचं आहे. स्वत:ला भविष्यवादी म्हणवणारे टॉम चीझराइट म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या मदतीने जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हीआर रोबोट्समध्येदेखील मानवी चेतना उत्पन्न केली जाऊ शकेल, तो दिवस उजाडणंही आता अशक्य नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेtechnologyतंत्रज्ञान