शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रविवार हाच दिवस वीकऑफसाठी कसा निवडण्यात आला? आपल्याला माहीत नसेल यामागची रंजक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:59 IST

Interesting Facts : रविवार हाच दिवस सुट्टी दिवस म्हणून कसा निवडला गेला? रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीसाठी निवडण्याची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे. 

Interesting Facts : आठवड्यातील सात दिवसांपैकी रविवारची वाट मोठ्या आतुरतेने बघितली जाते. इतकंच काय तर रविवार असा उल्लेख झाला तरी चेहऱ्यावर एक दिलासादायक हसू फुलतं. हा दिवस कुटुंबासोबत वेळ घालवण्यासोबतच कामातून थोडा ब्रेक घेण्याचा असतो. भारतात रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. बहुतेक लोकांना रविवारीच सुट्टी असते. शाळा, सरकारी ऑफिसेस, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा रविवारी सुट्टी असते. पण आपल्याला माहीत नसेल की, आधी असं नव्हतं. रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीसाठी निवडण्याची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे. 

ब्रेक न घेता करावं लागत होतं काम

आज आपण ज्या वीकेंडचा आनंद घेतो, तो नेहमीच तसा नव्हता. ब्रिटीश काळात भारतात खासकरून मुंबईच्या सूत गिरणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांची स्थिती फारच दयनीय होती. त्यांना आठवड्यातील सातही दिवस काम करावं लागत असे. लागोपाठ इतके दिवस काम करावं लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडत होता. याच त्यांच्या अवघड काळात त्यांचे हिरो बनले नारायण मेघाजी लोखंडे.

सात वर्षांची लढाई आणि न्याय

मजुरांची स्थिती पाहून लोखंडे यांनी त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला. १८८१ ते १८८४ दरम्यान त्यांनी आंदोलने केली आणि ब्रिटिश सरकारला अनेक संदेश पाठवले. लोखंडे यांच्या एका हाकेवर हजारो मजूर एकत्र आले होते. पण हा काही छोटा लढा नव्हता. हे आंदोलन तब्बल ७ वर्ष चाललं. शेवटी मजुरांची एकजुटता आणि लोखंडे यांच्या प्रयत्नासमोर ब्रिटिश सरकारला झुकावं लागलं आणि १० जून १८९० मध्ये भारतात रविवारी हा दिवस अधिकृतपणे साप्ताहिक सुट्टी दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

रविवारच का निवडला?

रविवार हा दिवस सुट्टी म्हणून निवडण्यामागे धार्मिक आणि व्यावहारिक अशी दोन कारणे होती. त्यावेळी भारतात ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश हे ख्रिश्चन धर्म पाळत होते. त्यांच्यासाठी रविवार हा चर्चेमध्ये जाण्याचा दिवस होता. त्यामुळे रविवार हाच सुट्टीचा दिवस ठरला. एक तर्क भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी जोडूनही देण्यात आला की, रविवार हा दिवस सूर्य देव आणि भगवान खंडोबाला समर्पित आहे. इंग्रजांप्रमाणे भारतीय मजुरांना देखील आराम आणि पूजेसाठी एक दिवस मिळायला हवा.

१७०० वर्ष जुना इतिहास

आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी सु्ट्टी असण्याची सुरूवात भारतात झाली नाही. याचा इतिहास फार जुना आहे इसवी सन ३२१ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टेंटाइन द ग्रेट याने सगळ्यात आधी रोमन साम्राज्यात रविवार हा दिव आरामाचा दिवस घोषित केला होता. हळूहळू ही परंपरा यूरोप आणि नंतर ब्रिटनमध्ये सुरू झाली. ब्रिटिश लोक ही परंपरा भारतात घेऊन आले.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके