शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

अजब! जगायला किती वस्तू लागतात? फक्त ४४; 'त्या' वस्तू कोणत्या? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 05:57 IST

आपल्याला जिवापाड गरज असलेली खरंच अशी कोणती वस्तू असते, मुळात असते का, गरज आणि शौक, हव्यास आणि हावरट खरेदी, वस्तुसंग्रहाची आवड आणि सवय हे सारे नक्की कशातून येते, हा मोठ्याच शोधाचा विषय आहे. सध्या जगभर त्याचा अभ्यास सुरू आहे.  

समजा, ठरवलंच की आपल्याकडे अशा किती वस्तू आहेत ज्या ‘आवश्यकच’ आहेत, त्यांच्याशिवाय नाहीच जगता येणार, तर गोळाबेरीज किती वस्तू असतील, मोजता येतील, कपडे, बॅगा, बूट, मोबाइल, पैशाचे पाकीट, केसाला लावायच्या तेलाची बाटली, अंगाचा साबण, हॅण्डवॉश, सॅनिटायझर ते स्वयंपाकाची भांडीकुंडी... करायलाच घेतली यादी तर किती वस्तूसंख्या होईल एकूण. या सगळ्या वस्तू खरंच गरजेच्या आहेत, आजकाल सतत फॉरवर्ड येतात की जगण्यामरण्याचा क्षण आहे आणि फक्त एकच वस्तू घेऊन तुम्हाला घराबाहेर पडायचे आहे तर तुम्ही काय न्याल? या प्रश्नाचे कामचलाऊ उत्तर देता येते; पण आपल्याला जिवापाड गरज असलेली खरंच अशी कोणती वस्तू असते, मुळात असते का, गरज आणि शौक, हव्यास आणि हावरट खरेदी, वस्तुसंग्रहाची आवड आणि सवय हे सारे नक्की कशातून येते, हा मोठ्याच शोधाचा विषय आहे. सध्या जगभर त्याचा अभ्यास सुरू आहे.  

जितका पसारा कमी, तितका आनंद जास्त, कामावर आणि वर्तमानावर फोकस जास्त, मन:शांती जास्त आणि भरभरून जगण्याची आस जास्त, मन ताळ्यावर. मिनिमलिझमचा मन:शांती आणि आनंद यांचा काय संबंध आहे, तो कशातून येतो आणि वस्तुसंचय आनंदाला का कात्री लावतो यावर जगभरात अधिक अभ्यास सुरू आहे. पण  प्रत्यक्षात माणसांना असे कमीत कमी वस्तूत जगता येते, ठरविले तर काय अशक्य आहे? अतिशय कमीत वस्तूंसह जगणाऱ्या रॉब ग्रीनफिल्डची ही गोष्ट. तो ३५ वर्षांचा आहे आणि सध्या त्याच्याकडे फक्त ४४ वस्तू आहेत. त्या तेवढ्याच वस्तूत तो सुखाने आनंदात जगतो आहे. अर्थात तो काही कायमच असे मिनिमलिस्ट जगत नव्हता. २०११ पर्यंत तो सगळ्यांसारखाच करिअररिस्ट, दिल मांगे मोअर म्हणतच जगत होता. त्यांची स्वत:ची डिजिटल मार्केटिंग कंपनी होती. त्याच काळात त्याने मिनिमलिस्ट जगण्यावर काही डॉक्युमेंटरीज पाहिल्या, पुस्तकं वाचली आणि हळूहळू त्याने आपल्याकडचा पसारा कमी करायला सुरुवात केली.

सलग सहा महिने जी वस्तू आपण वापरलीच नाही ती त्याने एकेक करून काढून टाकली. मिनिमलिझमचा किडा त्याला असा काही चावला की त्याने सतत काही दिवसांनी वस्तू कमी कमी करणे सुरू केले आणि मग उजाडले साल २०१५. त्याने स्वत:कडची कार काढून टाकली आणि तीन बेडरूमचे मोठे अपार्टमेंटही विकून टाकले. सॅन दिएगो शहरात फक्त ५० चौरस फुटांच्या घरात तो राहायला गेला. त्यावेळी त्याच्यासोबत होत्या फक्त १११ वस्तू. मग त्याने कमीत कमी सामानात रोड ट्रिप सुरू केली. प्रवास करू लागला, जग पाहू लागला. त्यातून त्याला वाटले की, हे एवढे सामानही फार जास्त आहे. एवढे कुठे लागते आपल्याला? मग वर्षभराच्या प्रवासानंतर त्याने ओरलॅण्डो शहरात फक्त १३०० डॉलर्समध्ये स्वत: एक घर बांधले. त्यासाठी त्याने ९९ टक्के सेकंडहॅण्ड मटेरिअल वापरले.

२०२० उजाडता उजाडता त्याने आपल्याकडचा ‘पसारा’ अजून कमी केला. त्याने १११ वस्तूंमधून फक्त ४४ वस्तू स्वत:कडे ठेवल्या. त्याचे म्हणणे आहे की स्वयंपाक, व्यक्तिगत काळजी आणि १२ कपडे एवढे मिळून ४४ वस्तू फार झाल्या. रॉब सांगतो, ‘गेले दशकभर मी डाऊनसायझिंग करतो आहे. त्यातून मला एवढेच कळले की, आपण कितीही वस्तू जमवल्या तरी त्या वस्तू आपल्याकडे आहेत म्हणून आपल्याला फार आनंद, फार काळ नाही होऊ शकत. समाधान वाटणे, तृप्त वाटणे तर फार लांब. आनंद वेगळ्या गोष्टीत असतो, वस्तूंमध्ये नाही. त्यामुळे मी ही अशी जीवनशैली स्वीकारली आणि मी खुश आहे.’ आता तर रॉबला वाटते की पायात जोड्यांची तरी काय गरज आहे?- म्हणून तो अनवाणीच राहतो.

रॉबचे म्हणणे आहे की, आपल्याला नवीन काॅर्पोरेट दुनिया सांगतेय की तुला आनंद हवा तर जास्त वस्तू हव्यात, जास्त वस्तू पाहिजे तर जास्त पैसे कमव, जास्त काम कर. म्हणजे पैसे कमावून, खर्च करण्याची ताकद सिद्ध करीत मी समाजाला सांगायचे की, बघा मी वाट्टेल ती वस्तू घेऊ शकतो; पण वस्तूंची किंमत मोजता मोजता मी माझी किंमत कधी करणार, माझा आनंद कसा शोधणार,’ वस्तू कमी करताना कोणती गोष्ट काढून टाकणे फार अवघड होते, या प्रश्नावर रॉब सांगतो, ‘सेलफोन. कुणाशीच आपल्याला बोलता येणार नाही, हे पटणे अवघड होते; पण मग एवढे बोलायची तरी गरज असते का? जमले मला नंतर... जमतंच.’

‘त्या’ ४४ वस्तू कोणत्या रॉबकडे कमीत कमी म्हणून ठेवलेल्या कोणत्या ४४ वस्तू आहेत. पाच शर्ट, दोन शॉर्टस्, दोन अंडरपॅण्ट, एक जोडी मोजे, एक स्वेटर, एक सॅण्डलचा जोड, एक बॅग, एक टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, नेलकटर, प्लॉस, रिलॅक्सेशनसाठी लॅवेण्डर, बॉडी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, ईअर प्लग्ज, हेअर ट्रिमर, कात्री, बॅकपॅक, खरेदीसाठी रियुजेबल बॅग, अ डे पॅक, एक भांडे, एक चमचा, पाण्याची बाटली, चहा गाळणी, चहापत्तीसाठी रिफेलेबल बॅग, एक नोटबुक, पेन, लॅपटॉप, लॅपटॉप स्टिकर, चार्जर, हेडफोन्स, पुस्तक, बुकमार्कर, पासपोर्ट, जन्माचा दाखला, एका पाकिटात रोख पैसै. तो आता बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड वापरत नाही. बुकमार्क म्हणून त्याच्याकडे गांधीजींचा फोटो आहे, तो त्याला फार आवडतो.