शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 08:49 IST

एखाद्या फूड डिलिव्हरी बॉयनं रोज किती तास काम करावं, रोज बाइकनं किती किलोमीटर प्रवास करावा आणि आपल्या गरजा कमीतकमी ...

एखाद्या फूड डिलिव्हरी बॉयनं रोज किती तास काम करावं, रोज बाइकनं किती किलोमीटर प्रवास करावा आणि आपल्या गरजा कमीतकमी करत किती पैसे वाचवावेत? चीनमध्ये फूड डिलिव्हरीचं काम करणारा २५ वर्षीय झांग झुएच्यांग हा तरुण गेल्या पाच वर्षांपासून रोज किमान १३ ते  १४ तास काम करतोय, आपल्या जीवनावश्यक खर्चातही जेवढी बचत आणि कपात करता येईल तेवढी करत आतापर्यंत तब्बल १.४२ कोटी रुपये त्यानं वाचवलेत आणि ग्राहकांपर्यंत फूड डिलिव्हरी देण्यासाठी बाइकवर आतापर्यंत सुमारे ३,२४,००० किलोमीटर अंतर त्यानं पार केलं आहे. कामाचा वेग आणि कार्यक्षमतेमुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या समर्पणाची दखल घेतली असून, त्याला ‘ग्रेट गॉड’ आणि ‘ऑर्डर किंग’ अशी नावं दिली आहेत.

झांगनं २०२० मध्ये शांघायमध्ये एका फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी काम करायला सुरुवात केली. तो दर महिन्याला लांबलांबच्या ३००हून अधिक ऑर्डर पूर्ण करतो. वाचलेल्या आणि वाचवलेल्या या पैशांतून पुढील वर्षी शांघायमध्ये नाश्त्याची दुकानं उघडण्याचा विचार तो करतो आहे. 

झांगनं अवघ्या पाच वर्षांत १.१२ मिलियन युआन म्हणजेच सुमारे १.४२ कोटी रुपये वाचवलेत. यासाठी आठवड्याचे सातही दिवस तो काम करतो. केवळ अत्यावश्यक गरजांवरच तो फक्त खर्च करतो. झांग झुएच्यांगचं झांगझोऊ शहरातलं नाश्त्याचं दुकान बंद पडलं होतं. त्यानंतर २०२० मध्ये तो शांघायला गेला. या अपयशी व्यवसायामुळे त्याच्यावर ५० हजार युआन म्हणजेच सुमारे ६.३७ लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. नव्यानं सुरुवात करण्याच्या इराद्यानं झांगनं शांघायमध्ये एका मोठ्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी काम सुरू केलं.

पाच वर्षांनंतर त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्यानं सांगितलं की डिलिव्हरी रायडर म्हणून काम करताना त्यानं एकूण १.४ मिलियन युआन म्हणजेच सुमारे १.७८ कोटी रुपये कमावले. कर्ज फेडून आणि राहण्याचा खर्च भागवूनही झांग १.१२ मिलियन युआन वाचवण्यात यशस्वी ठरला.झांग सांगतो, रोजच्या अत्यावश्यक गरजांखेरीज माझा दुसरा कुठलाही खर्च नाही. खाणं आणि झोपणं याखेरीज माझा सगळा वेळ ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवण्यात जातो.झांगचं शेड्युल खूपच व्यस्त आहे. तो दररोज सकाळी १०.३० पासून रात्री १ वाजेपर्यंत काम करतो. चायनीज स्प्रिंग फेस्टिव्हलच्या सुट्ट्यांमध्येच तो काही दिवसांची रजा घेतो. रोज इतकं प्रचंड काम आणि प्रवास करीत असल्यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढू नयेत यासाठी झांग विश्रांतीला प्राधान्य देतो आणि दररोज सुमारे साडेआठ तास झोप घेतो. जेवण आणि झोप याव्यतिरिक्त त्याचा रोजचा सगळा वेळ ग्राहकांना फक्त डिलिव्हरी देण्यातच जातो. प्रत्येक डिलिव्हरीसाठी साधारण २५ मिनिटं लागतात. झांग म्हणतो, कामाचा कंटाळा न करता त्यात आनंद मानणं आणि ग्राहकांना संतुष्ट राखणं यावरच माझा भर असतो. त्यातून ग्राहकांना आणि मलाही आनंद मिळतो. इतकी मेहनत केल्यानंतर भविष्याचं नियोजनही त्यानं करून ठेवलं आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत शांघायमध्ये नाश्त्याची दोन दुकानं उघडण्याचा त्याचा प्लॅन आहे. त्यासाठी ८ लाख युआन तो गुंतवणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Food Delivery Boy Earns Millions, Saves Fortune in Five Years

Web Summary : A 25-year-old food delivery driver in China saved ₹1.42 crore in five years by working 13-14 hours daily. He plans to open breakfast shops in Shanghai with his savings. He delivers over 300 orders monthly and focuses on customer satisfaction.
टॅग्स :chinaचीन