Facts of Elephant Pregnancy : हत्तींचं जीवन हे फारच रहस्यमय असतं. हत्ती सगळ्यात विशाल प्राण्यांपैकी एक आहे. इतका विशाल आणि शक्तीशाली असूनही लोकांना हत्तीचं खूपच आकर्षण असतं. लोकांना हत्तींबाबत वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची देखील उत्सुकता असते. हत्तीचे दात, सोंड, विशाल शरीर नेहमीच चर्चेत असतं. पण आज आम्ही हत्तीच्या गर्भधारणेबाबत रहस्यमय बाब सांगणार आहोत. वैज्ञानिकांनी हत्तीणीच्या लांब कालावधीच्या प्रेग्नन्सीचं रहस्य काही वर्षांपूर्वी उलगडलं होतं.
वेगवेगळ्या प्राण्यांच्या गर्भधारणेची आणि प्रसूतीची पद्धत वेगवेगळी असते. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, हत्तीणीच्या गर्भात तिचं पिल्लू हे तब्बल २ वर्षे राहतं. हा एखाद्या प्राण्याचा बाळाचा आपल्या आईच्या पोटात राहण्याचा सर्वात मोठा कालावधी आहे. प्रिसीडिंग्स ऑफ द रॉयल सोसायटी बी मध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना हत्तीणीच्या गर्भाबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे.
६४० ते ६६० दिवसांची गर्भधारणा
हत्ती हा फार बुद्धीमान प्राणी आहे. त्यांच्यात गर्भधारणेचा कालावधी ६४० ते ६६० दिवसांचा असतो. आतापर्यंत हत्तीणीच्या इतक्या लांब गर्भावस्थेबाबत फारशी माहिती नव्हती. विकसित अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजीने व्हेटर्नरी वैज्ञानिकांना असे काही उपकरणे मिळाले आहेत, ज्याने त्यांना हत्तीणीच्या गर्भावस्थेबाबत अधिक जाणून घेता आलं. हा रिसर्च ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या प्राणी संग्रहालयातील आफ्रिकेतील आणि आशियातील १७ हत्तीणींवर करण्यात आला. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, हत्तींच्या अंडोत्सर्गाचं एक खास चक्र असतं.
इतका कालावधी का लागतो?
डॉ. ल्यूडर्स यांनी सांगितले की, हत्तीणीमध्ये जास्त काळ गर्भावस्था चालते याचं कारण हार्मोनची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कोणत्याही जनावराच्या प्रजातीत होत नाही. वैज्ञानिकांनी सांगितले की, विषय केवळ इतकाच नाहीय की, हत्तीणींमध्ये २२ महिन्याचा गर्भावस्थेचा काळ फार जास्त असतो. त्याशिवाय दोन पिल्लांच्या जन्माचं अंतर देखील अधिक असतं. हे अंतर चार ते पाच वर्षाचं असतं. याने हत्तीच्या पिढीत फार अंतर येतं.
Web Summary : Elephants have a gestation period of 640-660 days, among the longest of mammals. Research reveals unique hormonal processes cause this long pregnancy. The interval between elephant births is also extensive, impacting population growth.
Web Summary : हाथियों का गर्भकाल 640-660 दिनों का होता है, जो स्तनधारियों में सबसे लंबा है। शोध से पता चलता है कि अद्वितीय हार्मोनल प्रक्रियाएं इस लंबे गर्भकाल का कारण बनती हैं। हाथी के जन्म के बीच का अंतराल भी व्यापक है, जो जनसंख्या वृद्धि को प्रभावित करता है।