शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न पिताही मनुष्य किती दिवस जिवंत राहू शकतो? पाहा कसा एक एक दिवसाचा पडतो प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:54 IST

Interesting Facts : अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

Interesting Facts : पाणी हे प्रत्येक प्राण्यासाठी जीवन आहे. आपल्या शरीराचा साधारण ६० ते ७० टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला आहे. शरीरातील अनेक महत्वाची कामे यावरच अवलंबून असतात. पाण्याने केवळ शरीराची भागते असं नाही तर पाण्याने शरीराचं तापमान कंट्रोल राहतं, कोशिका सक्रिय राहतात आणि जैविक प्रक्रियांमध्येही महत्वाची भूमिका निभावतं. अशात अनेकदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

पाण्याशिवाय मनुष्य किती दिवस जगू शकतो?

मेडिकल सायन्सनुसार, एक हेल्दी व्यक्ती पाण्याशिवाय सामान्यपणे ३ ते ७ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकते. अनेक केसेसमध्ये शरीरावर पाण्याच्या कमतरतेचा प्रभाव बघायला मिळतो आणि ३ ते ५ दिवसांच्या आतच स्थिती गंभीर होऊ शकते. जर शरीराला जास्त दिवस पाणी मिळालं नाही तर डिहायड्रेशनची समस्या वाढू लागते आणि हळूहळू शरीरातील अवयव डॅमेज होऊ लागतात.  

शरीरात पाणी झाल्यावर काय होतं? 

जर एखाद्या व्यक्तीने पाणी पिणं बंद केलं तर शरीर हळूहळू डिहायड्रेट होऊ लागतं. पहिल्या दिवशी व्यक्ती मोठी तहान लागते आणि तोंड कोरडं पडतं. दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, चक्कर, कमजोरी आणि थकवा यांसारख्या गोष्टी जाणवतात. तिसऱ्या दिवशी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर प्रभाव पडू लागतो. किडनी बरोबर काम करत नाही. शरीरातील तरल पदार्थ घाम आणि लघवीद्वारे बाहेर पडतात. ज्यामुळे रक्त घट्ट होऊ लागतं आणि शरीरातील ऑक्सीजनचा पुरवठा प्रभावित होतो. जास्त दिवस हेच सुरू राहिलं तर अनेक अवयव डॅमेज होऊ लागतात. 

शरीराला रोज किती पाणी हवं असतं? 

एक्सपर्टनुसार, शरीराला रोज पुरेसं पाणी मिळणं गरजेचं असतं. सामान्यपणे पुरूषांना दिवसातून साधारण ३.५ लीटर आणि महिलांना साधारण २.५ लीटर पाण्याची गरज असते. पण हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीचं वय, वजन, फिजिकल अॅक्टिविटी, खाणं-पिणं आणि वातावरण यावर अवलंबून असतं. जर एखादी व्यक्ती भरपूर पाणी असलेल्या भाज्या आणि फळं खात असेल तर त्याला पाणी कमी लागू शकतं. उन्हाळ्यात शरीराला जास्त पाणी हवं असतं, कारण या दिवसात घाम जास्त जात असल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : How Long Can a Person Survive Without Water? The Impact

Web Summary : Humans can survive 3-7 days without water. Dehydration affects organ function, causing headaches, fatigue, and kidney problems. Daily water needs vary based on activity and climate, with men needing about 3.5 liters and women 2.5 liters.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके