शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

निसर्गाची करणी अन् नारळात पाणी...पण नारळात पाणी येतं कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:19 IST

निसर्गाची करणी अन् नारळात पाणी, असा वाकप्रचार आपण सर्वांनीच ऐकलेला असतो. कदाचित अनेकांना याबाबत कुतूहलही असतं की, नारळात पाणी येतं कसं?

निसर्गाची करणी अन् नारळात पाणी, असा वाकप्रचार आपण सर्वांनीच ऐकलेला असतो. कदाचित अनेकांना याबाबत कुतूहलही असतं की, नारळात पाणी येतं कसं? पण सगळेच विचार करून सोडून देतात. मात्र, हा खरंच अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे की, नारळात पाणी येतं कसं? 

अनेकदा असं होतं की, लहान मुलेही त्यांच्या सवयीप्रमाणे नारळात पाणी कुठून येतं? असं विचारून जातात. पण त्यावेळी अनेकांकडे याचं नेमकं उत्तर नसतं. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत.

(Image Credit : wellthy.care)

quora.com वर ज्योत्सना बिश्नोई आणि उषा जैन-भटनागर यांनी माहिती दिली की, मुळात नारळात जे पाणी असतं त्याला नारळाच्या झाडाचं endosperm असं म्हटलं जातं. हे पाणी मुळांमधून उलट्या दिशेने वर शोषलं जातं. जे भ्रूणाच्या म्हणजेच नारळाच्या angiosperm मध्ये विकासावेळी आणि fertilasation नंतर इंडोस्पर्म nucleus मध्ये रुपांतरित होतं. 

(Image Credit : theswiftlife.com)

कच्च्या नारळात जे इंडोस्पर्म असतं ते nuclear type असतं. तसंच ते रंगहीन रूपात असतं. ज्यात अनेक nuclei तरंगत असतात. भ्रूण कोशात(नारळाच्या आत) हा तरल पदार्थ भरलेला असतो. यातच भ्रूणाचा विकास होतो. नंतरच्या अवस्थेत अनेक nuclei सेल्जसोबत मिळून नारळाच्या आतल्या बाजूला जमा होत जातं. नंतर याचा एक पांढरा जाड थर तयार होत जातो. हेच नंतर खोबरं म्हणून तयार होतं.

यात Free nuclei असल्याने हे फारच पोषक असतं. दुधापेक्षा अधिक प्रोटीन नारळात असतं. तसेच यात सर्वाधिक पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम सुद्धा असतं.

(Image Credit : India.com)

अनेक झाडांप्रमाणे नारळाचं झाड पाणी संचय करून ठेवण्यासाठी आपल्या फळांचा वापर करतं. हे पाणी झाडाच्या मुळातून एकत्र केलं जातं. नंतर कोशिकांद्वारे फळात जातं. इतर फळांमधून हे पाणी काढण्यासाठी फळांना पिळलं जातं. जे रसाच्या रूपात वापरलं जातं. पण नारळात हे पाणी आत असतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके