शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सरडा रंग कसा बदलतो तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यांचं रहस्य....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 16:41 IST

सरड्याच्या रंग बदलण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इतकेच नाही तर काहींनी सरड्यांना रंग बदलतानाही पाहिलं असेल.

(Image Credit : ripleys.com)

सरड्याच्या रंग बदलण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इतकेच नाही तर काहींनी सरड्यांना रंग बदलतानाही पाहिलं असेल. सरडे हे त्यांना निसर्गाकडून मिळालेल्या खास गिफ्टसाठीही प्रसिद्ध आहेत. पण सरडे रंग कसे बदलू शकतात? तुम्हाला जर हे माहीत नसेल तर निराश होऊ नका. कारण सरड्यांचं रंग बदलण्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नैसर्गिक कारण

जगात प्रत्येक जीवाकडे आपली एक खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन जगत असतात. असंच एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात, आपोआप ते त्या रंगात स्वत:ला सामावून घेतात. सरडे त्यांचा रंग बदलून स्वत:चा बचाव करतात. सरडे आपलं पोट भरण्यासाठी शिकारही करतात. शिकार करताना देखील सरडे त्यांचा रंग बदलतात. ज्याने शिकार पळून जात नाही. त्यामुळे सरडे शिकार सहजपणे करू शकतात.

वैज्ञानिक कारण

(Image Credit : massivesci.com)

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, सरडे त्यांच्या भावनांनुसार रंग बदलतात. राग, आक्रामकता, एकमेकांशी बोलण्यासाठी आणि दुसऱ्या सरड्यांना आपला मूड दाखवण्यासाठी सरडे त्यांचां रंग बदलतात. रिसर्चनुसार, सरडे अनेकदा त्यांचा रंग नाही तर केवळ चमक बदलतात. तेच धोक्याच्या स्थितीत सरडे आपल्या रंगासोबतच आकारही बदलतात. सरडे त्यांचा आकार मोठाही करू शकतात आणि गरज पडेल तर छोटाही करू शकतात.

कसे बदलतात रंग

(Image Credit : sabisabi.com)

सरड्यांच्या शरीरात फोटोनिक क्रिस्टल नावाचा एक थर असतो. याने सरड्यांना वातावरणानुसार रंग बदलण्यास मदत मिळते. फोटोनिक क्रिस्टलचा थर प्रकाशाच्या परावर्तनाला प्रभावित करते. ज्याने सरड्यांचा रंग बदललेला दिसतो. जसे की, जेव्हा सरडा जोशमध्ये असतो तेव्हा फोटोनिक क्रिस्टलचा थर सैल पडतो. याने लाल आणि पिवळा रंग परावर्तित होतो.

(Image Credit : bbc.co.uk)

तेच सरडे जेव्हा शांत होतात तेव्हा हे क्रिस्टल प्रकाशातील निळ्या तंरगांना परावर्तित करतात. त्यासोबतच सरड्यांमध्ये क्रिस्टलचा आणखी एक थर असतो, जो इतर थरांपेक्षा मोठा असतो. फार जास्त प्रकाश असल्यावर हा थर सरड्यांना गरमीपासून वाचवतो.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स