शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कल्पनाही नाही करवत अश्या जागी राहत होता तो बेघर माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:08 IST

अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पुर्ण करण्यासाठी एका व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षात न्यू यॉर्कमध्ये बेघरांची संख्या फार वाढली आहे. अशाप्रकारे आसरा शोधणे म्हणजे आश्चर्यच असल्याचे मत रहिवाश्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

न्युयॉर्क : न्यू यॉर्कसिटीमध्ये अनेक कूटुंब बेघर आहेत. बेघर लोकांची दयनीय अवस्था अनेक माध्यमातून जगासमोर येत असते. न्यु यॉर्कमधील अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका बेघर व्यक्तीने आसऱ्यासाठी चक्क ट्रेनमधल्या सीटखाली असलेल्या जागेचा आसरा घेतला. त्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एकाही प्रवासाला याविषयी माहिती नव्हती. त्यामुळे त्याच्या 'घरावर' बसून कित्येकांनी प्रवास केला. न्यू यॉर्क सिटीच्या रेल्वे मार्गावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे न्यू यॉर्कमध्ये किती मोठ्या प्रमाणात बेघरांची अवस्था आहे, याचं प्रत्यक्ष दर्शन होत असल्याच्या प्रतिक्रिया तेथील प्रवाशांनी दिल्या आहेत. हा फोटो दि न्यू यॉर्क पोस्ट या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून अशाप्रकारे रेल्वेच्या सीटखाली आसरा शोधणे म्हणजे आश्चर्यच असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

न्यू यॉर्कच्या रेल्वे प्रशासनाने कोणत्याच प्रकारचे नियम केले नसल्याने लोकांनी रेल्वेलाच आपला आसरा समजला आहे. जर रेल्वे प्रशासाने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर प्रवशांपेक्षा रेल्वेचे रहिवासीच जास्त येथे आढळतील, अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही वर्षात न्यू यॉर्कमध्ये बेघरांची संख्या फार वाढली आहे. न्यू यॉर्कच्या म्युनिसिपल शेल्टरमध्ये ऑगस्ट २०१७ च्या आकडेवारीनुसार १५ हजार ३१५ कुटुंब, २२ हजार ९७० बालके बेघर म्हणून राहतात. एवढंच नव्हे तर तब्बल १ लाख बेघर विद्यार्थीही येथे वास्तव्यास आहेत.फोटो सौजन्य - www.dailymail.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयHomeघर