शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

पत्त्यांमध्ये लपलं आहे एक रहस्य, अनेकदा खेळले असाल पण आलं नसेल लक्षात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 10:32 IST

पत्त्याबाबत एक अशी बाब आहे जी 90 टक्के लोकांना माहीत नसेल. यातील एक पत्त्यात रहस्य दडलंय.

पत्त्यांचा डाव हा अनेकांना आवडीचा टाइमपास असतो. जुगार म्हणून नाही तर लोक एक खेळ म्हणूनही पत्ते खेळतात. काही मित्र घरात बसून पत्ते खेळण्याचा आनंद घेतात. हा खेळ खेळताना डोकंही खूप चालवावं लागतं. पण पत्त्याबाबत एक अशी बाब आहे जी 90 टक्के लोकांना माहीत नसेल. यातील एक पत्त्यात रहस्य दडलंय.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरील r/opticalillusions नावाच्या ग्रुपवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. या ग्रुपवर ऑप्टिकल इल्यूजनसंबंधी फोटो शेअर केले जातात. नुकताच एक फोटो शेअर करण्यात आला. ज्याबाबत कदाचित तुम्हालाही माहीत नसेल.

हे कार्ड डायमंड 8 चं आहे. जर तुम्ही हे कार्ड बारकाईने बघाल तर मधे दिलेल्या डायमंडच्या रिकाम्या जागेत 8 नंबर बनलेला दिसेल. म्हणजे कार्डच्या रिकाम्या जागेत 8 ही संख्या बनवली आहे. हा नंबर बघण्यासाठी कार्डच्या मधे असलेल्या डायमंडकडे लक्ष देऊन बघा आणि गॅप्समध्ये तुम्हाला 8 नंबर दिसेल.

या पोस्टवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, पहिल्यांदा पाहिल्यावर 8 नंबर डोळ्यांसमोर जातच नाहीये. एकाने लिहिलं की, बराच वेळ पाहिल्यानंतर समजलं की, डायमंड 8 नंबरचा साइन बनवत आहे.

आणखी एक रहस्य

तुम्हाला माहीत असेलच की, 52 पत्त्यांमध्ये चार राजे असतात. यातील 3 राजांना मिशी असते.  पण चौथा राजा क्लीन शेव असतो. प्रश्न हा आहे की, 52 पत्त्यातील चौथ्या राजाला मिश्या का नसतात? कार्ड डिझाइन करणाऱ्याकडून काही चूक झाली? की यामागे काही कारण आहे? 

ज्याला मिशी नाही त्या राजाचं नाव काय?

पत्त्यांमध्ये ज्या राजाच्या चित्रात मिशी नाही त्याच राजाचं नाव आहे King of Hearts. King of Hearts नावाने एक सिनेमाही आला होता. त्यातही राजाला मिश्या नव्हत्या. तो फार सुंदर आणि क्लीन शेव आहे. पण British newspaper The Guardian नुसार, सुरूवातीला या राजालाही मिश्या असायच्या. पण एकदा कार्ड रिडिझाइन केलं जात होतं तेव्हा डिझायनर त्याला मिश्या काढणं विसरला आणि तेव्हापासून किंग ऑफ हार्ट्स विना मिश्या असलेला राजा झाला.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके