शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

जगभरात प्रसिद्ध या ब्रॅन्ड्सच्या लोगोंचा अर्थ काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 1:16 PM

ब्रॅन्डेड वस्तूंचा अट्टाहास करत असताना तुम्ही घेत असलेल्या ब्रॅन्डच्या लोगोचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही ब्रॅन्डच्या लोगोच्या कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

बदलत्या काळानुसार ब्रॅन्डेड वस्तूंची मागणी वाढली आणि त्या त्या ब्रॅन्डचे शोरूम्स वेगवेगळ्या शहरांमध्ये उभे राहिले. आपल्या जवळ असलेल्या सर्वच वस्तू ब्रॅन्डेड असायला हव्यात हा अट्टाहास अलिकडे तरूणांमध्ये दिसून येतो. वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सबाबत लोकांमध्ये क्रेझ बघायला मिळते. अनेक ब्रॅन्ड्सचे लोगोही जमा करण्याची आवड काहींना असते. हे लोगो अनेकांच्या मनावर ठसा उमटवत असतात. या प्रत्येक ब्रॅन्डच्या लोगोमध्ये काहीना काही अर्थ दडलेला असतो. मात्र, ब्रॅन्डेड वस्तूंचा अट्टाहास करत असताना तुम्ही घेत असलेल्या ब्रॅन्डच्या लोगोचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही ब्रॅन्डच्या लोगोच्या कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

* टोयोटा

टोयोटा ह्या कंपनीची स्थापना १९३३ साली किचिरो टोयोडा यांनी केली होती. संस्थापकांच्या नावात थोडा बदल करून या कंपनीला टोयोटा हे नाव देण्यात आले. ‘टोयोटा’ या गाडीच्या लोगोमध्ये आपल्याला तीन लंबवर्तुळ दिसतात. हे तीन लंबवर्तुळ दर्शवतात तीन हृदय. या तीन लंबवर्तुळामध्ये एक हृदय आहे ते ग्राहकाचं, दुसरं हृदय आहे प्रोडक्टचं आणि तिसरं हृदय ते टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील या कंपनीच्या प्रगतीचं.

* मॅकडॉनल्डस्

‘एम’ फॉर मॅकडॉनल्ड बस्स एवढाच या लोगोचा अर्थ आहे. ६०च्या दशकात मॅकडॉनल्ड्सचा लोगो बदलण्याचा निर्णय मॅकडॉनल्डस् यांच्यातर्फ़े घेण्यात आला होता. मात्र, ह्या लोगोचे कन्सलटंन्ट आणि सायकॉलॉजिस्ट लुईस चेस्किन यांनी लोगोतील गोल्डन आर्चेस तसेच राहू देण्याचा आग्रह धरला होता. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे म्हणणे होते की ग्राहकांना हा लोगो अनावधानाने “symbolism of a pair of nourishing breasts” सारखा भासतो. हे कितपत खरंय हे ते त्यांनाच माहिती पण मॅकडॉनल्डसचा लोगो हा जगात सर्वात जास्त ओळखला जाणारा लोगो आहे. १९४० च्या दरम्यान ही कंपनी रिचर्ड आणि मॉरीस मॅकडॉनल्ड यांनी सुरू केली होती.

* बीएमडब्ल्यू

बीएमडब्ल्यू कंपनीला विमानउड्डाण क्षेत्राचा इतिहास आहे. आणि त्यानुसारच या कंपनीचा लोगो कंपनीच्या इतिहासाची पाळंमुळं घट्ट धरून आहे. या लोगोमध्ये असलेला निळा रंग हा आकाशाचा आहे आणि पांढरा रंग हा विमानाच्या पंख्यासारखा आहे. म्हणजे विमानाचे पाते जेव्हा फिरते असतात तेव्हा त्या पात्यांमधून दिसणारे निळे आकाश. बीएमडब्ल्यू या कंपनीने द्वितीय महायुद्धाच्या वेळी एक महत्वाची भूमिका बजावली होती. बीएमडब्ल्यू कंपनीने जर्मन मिलिटरीसाठी विमानाची इंजने तयार करण्याचे महत्वाचे काम केले होते. जर्मनीत १९६१ साली ही कंपनी फ्रॅन्झ जोसेफ पॉप यांनी सुरू केली होती.

* अ‍ॅपल

अ‍ॅपल ही कंपनी आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्ससाठी प्रसिद्ध असून अ‍ॅपल कंपनीचा लोगो बायबल मधील अ‍ॅडम आणि इव्ह यांच्या कथेत असलेल्या ‘ट्री ऑफ नॉलेज’ मधून वगळण्यात आलेल्या फळाचे प्रतिनिधीत्व करतो. कॅलिफोर्निया येथे १९७७ साली स्टिव्ह जॉब्स आणि स्टिव्ह वॉझनियाक यांनी सुरू केली. स्टिव्ह जॉब्स यांच्या नावावर एकूण ३१७ उत्पादनांचे पेटंट आहे. आयपॉड आणि त्याच्याशी संबंधित ८५ उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आहे. लॅपटॉप, आयपॅड, आयपॉडपासून अ‍ॅपल टीव्हीपर्यंत जॉब्स यांच्या पोतडीतून अतिसुलभ आणि वेगवान उत्पादने तयार होत आहेत.

* फेडएक्स

फेडएक्स ही कुरिअरच्या क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी असून फेडएक्स या कंपनीचा लोगो अतिशय वेगळा आणि आकर्षक आहे. हा लोगो दिसताना फक्त या कंपनीचे नाव दिसते. पण जर तुम्ही निरक्षण करून या लोगोकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ‘ई’ आणि ‘एक्स’ या दोन शब्दांच्या मधे एक अ‍ॅरो दिसतो. हा अ‍ॅरो कंपनीच्या पुढे नेणा-या विकसीत विचारांना आणि भविष्याकडे कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन दर्शवतो. ही कंपनी आपली सेवा १९७३ सालापासून पुरवत आहे. फेडरीक स्मिथ यांनी ही कंपनी सुरू केली असून त्यांच्या नावातील फेड कंपनीच्या लोगोत आला आहे.

* मर्सिडिज-बेन्झ

मर्सिडिज-बेन्झ ही गाडी सर्वांना भूरळ घालणारी अशीच गाडी आहे. जेवढी ही गाडी आकर्षक आहे तेवढाच या कंपनीचा लोगो सुद्धा आकर्षक आहे. यात दिसत असलेले तीन स्टार हे कंपनी पुरवीत असलेल्या क्लॉलिटीतील वर्चस्व आणि सोबतच जमीन, समुद्र आणि हवा यांचीही स्टाईल दर्शवतात.

* आदिदास

आदिदास ह्या तरूणाईमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या ब्रॅन्डचा लोगो हा डोंगरासारखा वाटतो. हा डोंगर मार्गातील अडथळा भासवतो ज्या अडथळ्यांवर लोकांना मात करायची आहे. पण खरंतर आधीच्या लोगोमध्ये फक्त तीन स्ट्रीप्स दिल्या होत्या. या लोगोमध्ये फार काही अर्थ नव्हता. नंतर त्यांनी फक्त हे तीन स्ट्रीप्स डोंगरासारखे तिरपे दिसतील या पद्धतीने दर्शवले आहेत. आदिदास ही जर्मनीची कंपनी असून १९४८ साली ही अ‍ॅडॉल्फ डॅसलर यांनी स्थापन केली आहे. त्यांच्याच नावातील आणि आडनावातील शब्द कंपनीच्या नावात समाविष्ट करण्यात आले आहेत.

* एनबीसी

तुम्ही कधी विचार केलाय का की मोराला इतके रंग कसे आहेत ? याचं कारण हे की ५० च्या दशकात ‘एनबीसी’ची मालकी ‘आरसीए’कडे होती. आणि त्यांनी नुकतीच रंगीत टिव्हींची निर्मिती करायला सुरूवात केली होती. त्या काळात जास्त लोक हे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टिव्हीच बघायचे. त्यांना दिसते ती वस्तू किंवा प्राणी कलरफुल असूनही ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटच दिसत होती. ‘आरसीए’चं म्हणनं असं होतं की ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टिव्ही बघणा-यांना लोकांना हे कळावे की ते काय काय मिस करीत आहेत. म्हणून त्यांनी इतका कलरफुल लोगो तयार केला.

* ऑडी

जगभरात प्रसिद्ध असलेल्या गाड्यांची ही आणखी एक कंपनी आहे. भारतातही या कंपनीच्या गाड्या मोठ्याप्रमाणात लोकप्रिय आहेत. या कंपनीचा लोगो अगदी साधा आणि सरळ दिसतो. मात्र, लगेच याचा अर्थ कुणाच्या लक्षात येत नाही. या लोगोमध्ये चार गोलांची साखळी दाखवण्यात आली आहे. हे चार गोल ‘ऑटो युनियन कॉन्सोर्टियम’ मधील चार संस्थापक कंपनींचे आहेत. त्यात ‘डिडब्ल्यूके’, ‘हॉर्च’, ‘वंडरर’ आणि ‘ऑडि’ यांचा समावेश आहे. ह्या कंपनीची स्थापना १९३२ साली ऑगस्ट हॉर्च यांनी जर्मनी मध्ये केली.

* वोल्क्सवॅगन

आपल्या आकर्षक गाड्यांसाठी जगभरात व्होल्क्सवॅगन ही कंपनी प्रसिद्ध आहे. व्होल्क्सवॅगन ही एक जर्मन कंपनी असून या कंपनीच्या लोगोमध्ये ‘V’ आणि ‘W’ हे दोन शब्द प्रखरपणे दिसतात. यातील ‘V’ चा अर्थ आहे ‘Volks’ म्हणजेच लोक, जर्मनीतील लोक आणि ‘W’ चा अर्थ आहे “Wagen” म्हणजेच कार. एकुणच काय तर लोकांसाठीची कार असा या लोगोचा अर्थ आहे. १९३७ साली या कंपनीची सुरूवात जर्मनी येथून झाली आहे.

* अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन ही ऑनलाईन खरेदीच्या जगातील एक अग्रगण्य वेबसाईट म्हणून प्रसिद्ध आहे. या साईटचा लोगो जर का आपण निरीक्षण करून पाहिला तर आपल्याला अ‍ॅमेझॉन या शब्दाखाली एक अ‍ॅरो दिसतो. हा अ‍ॅरो एका स्माईली सारखाही भासतो. त्यावरून असे वाटते की अ‍ॅमेझॉन आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवतात असा एक अर्थ निघतो. मात्र, असा याचा अर्थ नसून हाच अ‍ॅरो आणखी निरीक्षण करून पाहिला तर तो अ‍ॅमेझॉन शब्दातील ‘a’ पासून सुरू होऊन ‘Z’ या शब्दावर रोखण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, अ‍ॅमेझॉन या कंपनीकडे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ‘A’ to ‘Z’ वस्तू आहेत. फक्त पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्यापासून ह्या कंपनीची सुरूवात झाली होती. १९९४ साली जेफ बेझोस यांनी ही वेबसाईट सुरू केली. 

टॅग्स :businessव्यवसायJara hatkeजरा हटके