शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम, डोळ्यात घातला नेल ग्लु अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 18:34 IST

काहीजण आयुष्यात काय प्रताप करतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे हे प्रताप केल्यावर त्याचे परिणाम भयानक होतात. काही जणांना तर हे ठाऊकही असतं पण तरीही काहीजण ऐकतच नाहीत.

काहीजण आयुष्यात काय प्रताप करतील हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे हे प्रताप केल्यावर त्याचे परिणाम भयानक होतात. काही जणांना तर हे ठाऊकही असतं पण तरीही काहीजण ऐकतच नाहीत. काहीच दिवसांपूर्वी एका माकडीनीने आपल्या संपूर्ण अंगाला ग्लु लावला होता. त्याचे परिणाम काही असे झाले की तिची सर्जरी करून तिचा ग्लु आणि चिकटलेले केस वेगळे करावे लागले.अशीच एक कॅटी बेथ. ही मुळची युके मधील. हिने आपल्या डोळ्यात नेलपॉलिशचा ग्लु घातला. त्यानंकर त्याचे दुष्परिणाम तिला भोगावे लागले.त्याचं झालं असं की कॅटी एक वेबसिरीज पाहत होती. तेव्हा तिने हा ग्लु तिच्या उजव्या डोळ्यामध्ये घातला. कॅटीचे आयड्रॉप असलेली बाटली आणि ग्लुची बाटली सारखी दिसत होती. वेबसिरीज बघता बघता कॅटीने ग्लुची बाटली उचलली आणि ती डोळ्यात घातली.

तिचे डोळे जळजळायला लागले. तरीही तिने त्या बाटलीतून पुन्हा एक ड्रॉप डोळ्यात घातला. ज्यावेळी तिच्या डोळ्याची जळजळ वाढली आणि तिने चेक केले तेव्हा तिला समजले की ही नेल ग्लुची बाटली आहे जी तिने डोळ्यात घातली. ती धावतच किचनमध्ये गेली व डोळ्यांवर पाणी मारले.तरीही तिची जळजळ काही कमी होईना. ती शेजाऱ्यांकडे गेली. शेजाऱ्यांनी त्वरित तिला रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरही हा प्रकार पाहुन अवाक् झाले. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी हा प्रकार पहिल्यांदा पाहिला होता. ते जास्त काही करू शकत नव्हते. त्यांनी गरम पाण्यात भिजवलेल्या कापसाच्या बोळ्याने डोळ्यातील ग्लु साफ केला.कॅटी सांगते की ज्यादिवशी तिने ग्लु डोळ्यात घातला ती रात्र अत्यंत भयंकर होती. थोडासा ग्लु अजूनही तिच्या पापण्यांना चिकटलेला होता. तिच्या डोळ्यात जळजळ होत होती. इतकेच नव्हे तर तिचा डोळा लाल होऊन सुजला देखील होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके