शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'हे' आहे जगातील सर्वात महाग अननस, किंमत जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 18:57 IST

Heligan pineapple : हेलिगन अननस (Heligan pineapple) असे या महागड्या अननसचे नाव आहे.

अननस (Pineapple) व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचे एक समृद्ध स्रोत मानले जाते. विशेषत: हिवाळ्यात हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. पण, तुम्हाला जगातील सर्वात महागडे अननस माहीत आहे का?  या अननसाची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिगन अननस (Heligan pineapple) असे या महागड्या अननसाचे नाव आहे. हे नाव त्या बागेवरून ठेवले आहे, जिथे ते इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये उगवले जाते. एका अननसाची किंमत जवळपास 1,000 पौंड स्टर्लिंग (1 लाख रुपये) आहे. या अननसाचे एक पीक तयार होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात.

एका वेबसाइटने दिलेल्यानुसार, हे अननस 1819 मध्ये ब्रिटनमध्ये आणले होते. त्यावेळी लवकरच बागायतदारांच्या लक्षात आले की, देशातील हवामान अननस लागवडीसाठी चांगले नाही. त्यामुळे येथील बागायतदारांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी विशेष लाकडी खड्ड्याच्या आकाराची भांडी तयार करून आणि अननसच्या पीकांना पोषण देण्यासाठी कुजलेल्या खताचा नवीन पुरवठा आणि एक बॅकअप हीटर जोडले. या उष्णतेमुळे हवा गरम होते, जी भिंतीतील छिद्रांद्वारे खड्ड्यांमध्ये प्रवेश करते.

रिपोर्टनुसार, हेलिगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, "अननसाचे उत्पादन घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अननसाची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ, खताचा वाहतूक खर्च, अननसाचे खड्डे आणि इतर लहान तुकड्यांची देखभाल करावी लागते. प्रत्येक अननस आम्हाला 1,000 पाउंड किंमतीला पडतो आहे."

10 लाखांपर्यंत जाऊ शकते किंमतहेलिगन वेबसाइटनुसार, राणी एलिझाबेथ द्वितीय यांना व्हिक्टोरियन ग्रीनहाऊसमध्ये उगवलेले दुसरे अननस भेट देण्यात आले होते. तसेच, उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, अननसाचा लिलाव झाल्यास प्रत्येक अननसाची किंमत 10 लाखांपर्यंत असू शकते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके