शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपघात झाल्यास 'या' रक्तगटाच्या व्यक्तींना असतो मृत्यूचा जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 09:22 IST

गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीसाठी ओ गटाचे रक्त धोकादायक ठरण्याचीही शक्यता असते.

मुंबई: एखादी गंभीर इजा झाल्यास ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त असल्याची बाब एका संशोधनातून सिद्ध झाली आहे. या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या तयार करणारा घटक कमी प्रमाणात अस्तित्ताव असतो. परिणामी एखादी मोठी जखम झाल्यास त्यांच्या शरीरातून रक्त अधिक वेगाने वाहते, असे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत मृत्यूचा जास्त धोका असतो.यासाठी जपानच्या एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील 901 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी जखमींपैकी ओ रक्तगटाच्या 28 टक्के व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. इतर रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये हेच प्रमाण 11 टक्के इतके होते. यावरूनच अतिरक्तस्त्रावाची समस्या ओ रक्तगटाच्या व्यक्तींसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.एखाद्या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींचा मृत्यू  शक्यतो अतिरक्तस्त्रावामुळे होतो. त्यामुळे आम्ही विविध रक्तगटाच्या व्यक्तींनुसार याचा अभ्यास करायचा ठरवला. जेणेकरून गंभीर जखमी झालेल्या रुग्णांचा रक्तगट वेगवेगळा असल्यास होणाऱ्या परिणामांबाबत आम्हाला ठोस निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. वाटुर ताकायामा यांनी सांगितले. ओ हा सर्वसाधारण रक्तगट मानला जातो. रक्तपेशींमध्ये असणाऱ्या प्रोटीन्सच्या प्रमाणावर व्यक्तीचा रक्तगट ठरतो. त्यानुसार ओ, ए, बी आणि एबी अशी रक्तगटांची विभागणी केली जाते. ओ रक्तगटाच्या व्यक्तींचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तींना चालते. मात्र, गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीसाठी ओ गटाचे रक्त धोकादायक ठरण्याचीही शक्यता असते. यामुळे संबंधित व्यक्तीला अपंगत्त्व किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याची बाब या अभ्यासातून समोर आली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यAccidentअपघात