शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

भारतातील 'हे' रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे ४२ वर्ष ठेवलं होतं बंद, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 11:13 IST

Haunted Railway Station : हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे.

Haunted Railway Station : देशातील एखादं रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद झालं असल्याचं ऐकल्यावर अर्थातच कुणालाही विचित्र वाटेल. त्यातल्या त्यात हे स्टेशन सुरू होऊन केवळ सातच वर्षे झाली होती. अनेकांना ही गंमतही वाटू शकते, पण ही गंमत नाही तर खरं आहे. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे.

हे रेल्वे स्टेशन १९६० मध्ये सुरू करण्यात आलं होतं. रेल्वे सेवा सुरू झाल्यावर काही वर्षे या स्टेशनवर सगळं काही व्यवस्थित होतं. पण अचानक एक विचित्र घटना घडू लागली. १९६७ मध्ये बेगुनकोडोर रेल्वे स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका महिलेचं भूत पाहिल्याचा दावा केला होता. सोबतच अशीही अफवा पसरली होती की, याच स्टेशनवर या मुलीचा एका रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांना याबाबत सांगण्याचा प्रयत्नही केला, पण लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं.

पण खरी अडचण तेव्हा वाढली जेव्हा बेगुनकोडोरचे स्टेशन मास्टर आणि त्यांचा परिवात रेल्वे क्वार्टरमध्ये मृत आढळले. नंतर येथील लोकांनी असाही दावा केला होता की, त्यांच्या मृत्यूमागे त्याच महिलेच्या भूताचा हात आहे. लोक सांगू लागले होते की, जेव्हा एखादी रेल्वे येथून जाते तेव्हा त्या मुलीचं भूतही रेल्वेसोबत धावू लागतं. 

या विचित्र घटनांनंतर बेगुनकोडोर हे रेल्वे स्टेशन चांगलंच चर्चेत आलं आणि हेच रेल्वेच्या रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे. लोकांमध्ये या मुलीच्या कथित भूताची इतकी भिती पसरली की, लोक स्टेशनवर येणं बंद झालं. इतकेच नाही तर स्टेशनवरील कर्मचारीही भीतीमुळे पळून जात होते.

असे मानले जाते की, जेव्हाही एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याची पोस्टिंग इथे होत होती, ते लगेच इथे येण्यास नकार देत होते. नंतर तर इथे रेल्वे थांबणंह बंद झालं. कारण भीतीमुळे कुणाला इथे उतरायचं देखील नव्हतं आणि ना कुणी रेल्वेत बसण्यासाठी येत होते. त्यानंतर संपूर्ण स्टेशन सामसूम झालं.

असे म्हणतात की, या रेल्वे स्टेशनवरील कथित भूताची चर्चा पुरूलिया जिल्ह्यापासून ते कोलकाता आणि पुढे रेल्वे मंत्रालयापर्यंत झाली होती. असेही सांगितले जाते की, जेव्हा येथून एखादी रेल्वे जात होती तेव्हा लोको पायलट स्टेशन येण्याआधीच स्पीड वाढवत होते. तसेच लोकही स्टेशन येण्याआधीच दारं-खिडक्या लावून घेत होते.

तब्बल ४२ वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये गावातील लोकांच्या मागणीवरून तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हे रेल्वे स्टेशन सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत भूताचा असा काही दावा करण्यात आलेला नाही. पण आजही लोक सायंकाळी या स्टेशनवर जाणे टाळतात. सध्या इथे १० रेल्वे थांबतात. या स्टेशनची इतकी चर्चा झाली होती की, लोक त्यामुळेच हे स्टेशन बघण्यासाठीही येतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे