शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News: ...म्हणे आकाशातून कोसळतोय कोरोना; शहरातील जनता घरातून बाहेरच पडेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 4:06 PM

प्रशासनाला जे जमलं नाही ते गारपिटीनं करून दाखवलं; संपूर्ण शहर लॉकडाऊन

मेक्सिको: संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं असून बाधितांचा आकडा ५० लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केला आहे. मात्र तरीही काही देशांमध्ये लोक लॉकडाऊनचे नियम पाळत नाहीत. मेक्सिकोमध्ये एक अजब प्रकार घडल्यानं संपूर्ण शहर आपोआप लॉकडाऊन झालं. आकाशातून कोरोना कोसळत असल्याची अफवा पसरल्यानं नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत. त्यामुळे एका अफवेनं सगळं शहरच क्वारंटिन झाल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.मेक्सिकोमधल्या काही रस्त्यांवर नागरिकांना कोरोना विषाणूच्या आकाराचे बर्फाचे गोळे आढळून आले. नुइवो लेऑन राज्यातल्या भागात गारपीट झाली. आकाशातून कोसळलेले बर्फाचे गोळे कोरोना विषाणूच्या आकाराचे होते. आकाशातून कोरोना कोसळत असल्याची अफवा यानंतर सगळीकडे पसरली आणि एकच घबराट निर्माण झाली. विशेष म्हणजे अशाच प्रकारची गारपीट याआधीही शहरात झाली आहे. मात्र सध्या कोरोनाची दहशत असल्यानं सगळेच घाबरले. सध्या सोशल मीडियावर गारपिटीचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. संपूर्ण जगभरातल्या सोशल मीडियावर या कोरोना विषाणूच्या आकाराच्या बर्फाच्या गोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशा प्रकारची गारपीट अतिशय सामान्य बाब असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. 'जोरदार वादळात आकारानं मोठे असलेले बर्फाचे गोळे एकमेकांवर आदळतात. त्यामुळे त्यांचा आकार बदलतो. बर्फाच्या गोळ्यांचा काही भाग टोकदार होतो,' अशी माहिती हवामानतज्ज्ञ जोस मिग्युल विनास यांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी घरातच राहावं, बाहेर पडणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येतं आहे. गेल्या २४ तासांत मेक्सिकोमध्ये कोरोनाचे २ हजार ७१३ रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्यांदाच मेक्सिकोमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ झाली आहे. मात्र आता मेक्सिकोमधील नागरिक घरात राहू लागले आहेत. आकाशातून कोरोना विषाणू कोसळत असल्याची अफवा पसरत असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडणं बंद केलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या