शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे वाह! पत्नीनेच पतीला दिली २ गर्लफ्रेन्ड्ससोबत लग्न करण्याची संमती; म्हणाला, "दुसरे माझ्यावर जळतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 17:17 IST

आपल्या पत्नीच्याच मर्जीनं पती करतोय दोन गर्लफेन्ड्ससोबत लग्न. पाहा काय आहे प्रकरण.

ठळक मुद्देआपल्या पत्नीच्याच मर्जीनं पती करतोय दोन गर्लफेन्ड्ससोबत लग्न.

लग्न हे सात जन्माचं नातं असतं असं म्हणतात. परंतु जर पत्नीनं आपल्याच पतीला तिच्या मर्जीनं दोन गर्लफेन्ड्ससोबत लग्न करण्याची परवानगी दिली, असं जर म्हटलं तर नक्कीच तुम्हाला शॉक बसेल. परंतु हे अगदी खरं आहे. जर्मनीमधून सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्याच पत्नीच्या परवानगीनं आपल्या दोन गर्लफेन्ड्ससोबत लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, यानंतर आसपासच्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि पत्नीच अशी परवानगी कशी देऊ शकते, अशीही विचारणा होऊ लागली. 

जर्मनीतील कोलोन शहरातून हे प्रकरण समोर आलं आहे. मिररच्या रिपोर्टनुसार ३५ वर्षीय मार्को सँटो सिल्वानं कायदेशीररित्या ३५ वर्षीय डेनिएला सिल्वा हिच्यासोबत लग्न केलं असून ते दोघंही २०१२ पासून एकत्र राहत आहेत. पंतु आता मार्को सँटो सिल्वानं आपल्या दोन गर्लफ्रेन्ड्ससोबत लग्न करण्याची घोषणा केली असून त्यासाठी आपल्या पत्नीनंही परवानगी दिल्याचं म्हटलं आहे. २०१९ मध्ये त्याची भेट जेसिका आणि कामिला यांच्याशी झाली होती. यांच्या संवादादरम्यान मैत्री झाली आणि त्यानंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. यानंतर मार्कोनं त्यांना आपल्या पत्नीशीदेखील भेटवलं.

मार्को आणि डेनिएला यांची दोन मुलंही आहे. असं असलं तरी तो आपलं नातं पुढे नेण्याच्या तयारीत आहे. जेसिका आणि कामिलादेखील या लग्नासाठी तयार असल्याचं मार्कोचं म्हणणं आहे. दरम्यान, आपल्या आनंदावर विरजण पडू नये यासाठीही भीती वाटत असल्याचं त्यानं नमूद केलं. तसंच लोकं आपल्यावर जळत असल्यानं आपण सांभाळून पुढे जात असल्याचंही त्यानं सांगितलं. सध्या हा विषय त्यांच्या राहत्या ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे. तसंच हे तिघं आपलं नातं असामान्य असल्याचं दाखवण्यासाठी उत्सुक आहे. तसंच आपण आपलं नातं चांगल्या प्रकारे निभावू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Germanyजर्मनीmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल