शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने केलेली डिमांड ऐकून नवरदेव 'कोमात'! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 10:33 IST

असाच एक किस्सा पंजाबातील फिरोजपूर येथे घडला. इथे एका तरूणासोबत त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही घडलं की, तो नेहमीसाठी लक्षात ठेवेल.

लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत सर्वांच्याच काहीना काही अपेक्षा असतात. अनेक प्रश्न मनात येत असतात तर जरा भीतीही असते. अनेकांच्या पहिल्या रात्रीचे अनेक विचित्र किस्सेही असतात. असाच एक किस्सा पंजाबातील फिरोजपूर येथे घडला. इथे एका तरूणासोबत त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही घडलं की, तो नेहमीसाठी लक्षात ठेवेल. या घटनेने नवरदेवाला तर धक्का बसलाच सोबतच त्याच्या परिवारालाही बसला.

फिरोजपूरच्या ममदोटमधील घरात सुन आल्यावर आनंदाचं वातावरण होतं. अर्थातच नवरदेव जास्त आनंदात होता. कारण त्याची लग्नानंतरची पहिली रात्र होती. मोठ्या आनंदाने नवरदेव नवरीजवळ गेला आणि तिच्या डोक्यावरील पदर बाजूला केला. सामान्यपणे अशावेळी जास्तीत जास्त नववधू लाजतात. पण ही नवरी लाजली नाही तर आरडा-ओरड करू लागली.  तिने वस्तू फेकफाक करणं सुरू केलं. आणि 'मेनू चित्ता चहिंदा...म्हणजेच 'मला नशा हवी... नशा हवी', असं ती ओरडू लागली. 

आता लग्नाच्या पहिल्या रात्री कशात काही झालेलं नसताना अशाप्रकारची मागणी केल्यावर नवरदेव हैराण झाला. तो लगेच बाहेर आणि सर्वांना याबाबत सांगितले. सर्वांचा आनंद दु:खात बदलला. नंतर घरातील लोकांनी नवरीला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती काही ऐकेना.

(प्रातिनिधीक छायाचित्र)

मग नवरीला लगेच व्यसनमुक्ती केंद्रात नेलं. नवरीला औषध देऊन शांत करण्यात आलं. ही तरूणी अनेक वर्षांपासून व्यसन करत असल्याचं समोर आलं. पण हे तरूणापासून लपवण्यात आलं होतं. पण लग्नाच्या पहिल्या रात्री तिला नशेची तलफ आली आणि हा प्रकार समोर आला.

आता हा तरूण हे लग्न मोडण्याची तयारी करतो आहे. त्यासाठी त्याने डॉक्टरांकडे तरूणी व्यसनाधीन असल्याचं लेटर देण्यास सांगितलं आहे. दरम्यान, ही अशाप्रकारची पहिलीच घटना असली तर पंजाबमध्ये अंमली पदार्थांचं सेवन फारच वाढलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPunjabपंजाब