आश्चर्यकारक - गुजरातमधल्या बारडोलीतल्या या स्मशानभूमीची रचना आहे चक्क स्मशानभूमीसारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:18 IST2017-07-24T00:42:10+5:302017-08-21T17:18:18+5:30

गुजरातमधील ही स्मशानभूमी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण, याची रचना विमानतळासारखी आहे. या स्मशानभूमीचे

Graveyard like an airport | आश्चर्यकारक - गुजरातमधल्या बारडोलीतल्या या स्मशानभूमीची रचना आहे चक्क स्मशानभूमीसारखी

आश्चर्यकारक - गुजरातमधल्या बारडोलीतल्या या स्मशानभूमीची रचना आहे चक्क स्मशानभूमीसारखी

गुजरातमधील ही स्मशानभूमी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण, याची रचना विमानतळासारखी आहे. या स्मशानभूमीचे नाव आहे ‘अंतिम उडाण मोक्ष यात्रा.’ स्मशानभूमी म्हटले की, प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती दिसून येते; पण गुजरातच्या बारडोलीमध्ये सोमाभाई पटेल यांनी ही आगळीवेगळी स्मशानभूमी उभारली आहे. या परिसरात विमानाच्या आकाराच्या दोन प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत. त्यांचे नाव आहे ‘मोक्ष एअरलाइन्स’ आणि ‘स्वर्ग एअरलाइन्स.’ या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येताच विमानतळासारखी अनाऊंसमेंट केली जाते. कोणत्या गेटमधून प्रवेश करायचा आहे आदी सूचना यावेळी देण्यात येतात. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी चाळीस गावचे लोक येतात.

Web Title: Graveyard like an airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.