रिकी, वास्वानी यांना ग्रॅमी पुरस्कार
By Admin | Updated: February 10, 2015 00:10 IST2015-02-09T23:29:24+5:302015-02-10T00:10:48+5:30
बंगळुरू येथील संगीतकार रिकी केज व कार्यकर्ती नीला वास्वानी यांच्या विंडस् आॅफ समसारा या अल्बमला, तसेच मलाला युसूफझाईवरील वृत्तपटाला ५७ व्या ग्रॅमी समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
रिकी, वास्वानी यांना ग्रॅमी पुरस्कार
लॉस एंजिल्स : बंगळुरू येथील संगीतकार रिकी केज व कार्यकर्ती नीला वास्वानी यांच्या विंडस् आॅफ समसारा या अल्बमला, तसेच मलाला युसूफझाईवरील वृत्तपटाला ५७ व्या ग्रॅमी समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
केज यांना त्यांच्या विंडस् आॅफ समसारा या अल्बमला नव्या युगाचा अल्बम म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. रिकी केज यांनी दक्षिण आफ्रिकेचे फ्लूट वादक वाऊटर केलेरमन यांच्या साथीने हा अल्बम तयार केला.
नीला वास्वानी यांचा व्हेअर लाँग ग्रास बेंडस् व यू हॅव गिव्हन मी अ कंट्री हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘आय अॅम मलाला : हाऊ वन गर्ल स्टूड अप फार एज्युकेशन अँड चेंज्ड् द वर्ल्ड’ (मलाला युसूफझाई) या अल्बमला बेस्ट चिल्ड्रन्स श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. (वृत्तसंस्था)