'या' सुंदर बेटावर राहण्यासाठी लोकांना सरकारकडून मिळणार मोफत घर अन् महिन्याला ४० हजार रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 02:26 PM2019-08-10T14:26:11+5:302019-08-10T14:36:40+5:30

शहरं आणि गावांसोबतच असेही अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोक राहू शकतात. असंच एक अनोखं ठिकाण ग्रीसमध्ये आहे.

This Gorgeous Greek Island Wants To Pay People To Move There | 'या' सुंदर बेटावर राहण्यासाठी लोकांना सरकारकडून मिळणार मोफत घर अन् महिन्याला ४० हजार रूपये!

'या' सुंदर बेटावर राहण्यासाठी लोकांना सरकारकडून मिळणार मोफत घर अन् महिन्याला ४० हजार रूपये!

googlenewsNext

(Image Credit : www.telegraph.co.uk)

शहरं आणि गावांसोबतच असेही अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोक राहू शकतात. असंच एक अनोखं ठिकाण ग्रीसमध्ये आहे.  येथील एका सुंदर आयलंडवर लोकांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे. या आयलंडवर राहण्यासाठी सरकार लोकांना मोफथ घर आणि दर महिन्याला ४० हजार रूपये देत आहे.

(Image Credit : Social Media)

telegraph.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रीसमधील या आयलंडचं नाव आहे एंटीकायथेरा. हे आयलंड तेथील स्वच्छ पाणी आणि सुंदर डोंगरांसाठी देशात प्रसिद्ध आहे. २० किमोमीटर परिसरात असलेल्या या आयलंडवर सध्या केवळ २४ लोक राहतात. 

(Image Credit : www.simplemost.com)

(Image Credit : Social Media)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आयलंडवर राहण्याची सरकारची ऑफर लोकांनाही पसंत येत आहे. अनेकांनी इथे राहण्यासाठी अर्जही केले आहेत. तसेच तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या आयलंडवर शाळाही आहे. जी लहान मुलांची संख्या कमी असल्याने बंद पडली होती. पण आता पुन्हा ही शाळा सुरू करण्यात आली आहे.

(Image Credit : Social Media)

सरकार या आयलंडवर खासकरून बेकिंग, शेती आणि निर्मिती कार्याशी संबंधित लोकांना राहण्यासाठी बोलवत आहे. कारण या कामातून लोक इथे चांगली कमाई करू शकतील. इतकेच नाही तर सरकार सुरूवातीला इथे येऊन राहणाऱ्या लोकांना तीन वर्षांपर्यंत दर महिन्याला ५०० यूरो म्हणजेच साधारण ४० हजार रूपये देतील.

(Image Credit : Social Media)

असं असलं तरी या आयलंडवर राहण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना सरकारच्या काही अटी मान्य कराव्या लागतील. त्या मान्य असल्या तरच लोक इथे राहण्यासाठी निवडले जातील. या अटी येथील स्थानिक सरकार लागू करेल.

Web Title: This Gorgeous Greek Island Wants To Pay People To Move There

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.