शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

रॅपरच्या डोक्यावर ‘उगवले’ सोन्याचे केस!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:14 AM

सोबतचा फोटो पाहिलात ? हा एक  रॅपर आहे आणि त्याच्या डोक्यावर दिसतात ते केस खऱ्याखुऱ्या सोन्याचे आहेत! हे काय आता नवीन?

तरुण मुलामुलींच्या केसांच्या स्टाईलमध्ये चकीत व्हावे, आश्चर्य वाटावे असे काही नसते खरेतर!  भारताच्या ध्वजापासून ते जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या लोगोपर्यंत कुठलीही चित्रं या तरुणाईच्या डोक्यावर उगवलेली आपण पाहिली आहेत. माध्यमांमध्ये ही छायाचित्रे, व्हीडीओ, क्लिप्स आवर्जून दाखवली जातात. या गोष्टीचं अनेकांना अप्रूप वाटतं, तर ही काय थेरं चाललीयत म्हणून अनेकजण नाकंही मुरडतात.  तीच गोष्ट केस कलर करण्याची. तरुणाईनं आपल्या केसांवर इतके रंग चोपडले, की इंद्रधनुष्य त्यापुढे कधीच फिकं पडलं. आजकाल घरांना रंग देण्यासाठी हजारो रंग उपलब्ध झाले आहेत, तेही कमी पडतील, इतकी या केसांच्या रंगरंगोटीची तऱ्हा!!पण पुढे काय? आता नवीन काय करायचं? आपण हटके दिसलं पाहिजे, सोशल मीडियावर आपले फाॅलोअर्स झपाट्यानं वाढले पाहिजेत, यासाठी काय करायला हवं??..डोक्यावरच्या केसांमधून ‘वेगवेगळे रस्ते’ काढण्याचं नावीन्य कधीच ओसरलं. केसांवर लावायचे रंगही जवळपास ‘संपले’.. आता यापुढे काहीतरी हटके स्टाईल हवी.. अशीच एक हटके स्टाईल मेक्सिकोमधल्या या तरुण रॅपरला सापडली. डॅन सूर हे त्याचं नाव. २३ वर्षांच्या या रॅपरनं त्याच्या क्षेत्रात तसं बरं नाव कमावलं होतं, पण त्याला आपल्या कलेबरोबर इतरही गोष्टींनी फेमस व्हायचं होतं. खूप दिवस, महिने तो यावर विचार करीत होता. शेवटी त्यावरचा उपाय त्याला सापडला. त्यानं आपल्या डोक्यावरचे सारे केस काढून टाकले आणि त्याजागी चक्क सोन्याच्या साखळ्या इम्प्लांट केल्या. चांगल्या मोठमोठ्या. अगदी चेहराही झाकल्या जाणाऱ्या आणि खांद्यापर्यंत येणाऱ्या! - त्याला जे पाहिजे होतं, तेच घडलं! डॅन सूर रातोरात फेमस झाला. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांत त्याचे फोटो, व्हीडीओ झपाट्यानं व्हायरल, शेअर व्हायला लागले! तरुणाईला त्याची ही हटके स्टाईल खूपच पसंत पडली.पण या स्टाईलचा खर्च आणि वेदना मात्र सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. केसांच्या जागी डोक्यावर सोन्याच्या साखळ्या इम्प्लांट करण्याच्या आधी त्याला मोठी सर्जरी करावी लागली. कवटीत हूक बसवावे लागले आणि त्यात या साखळ्या अडकवाव्या लागल्या. सोन्याच्या या साखळ्यांचा खर्च किती आला असेल, याची आपण कल्पना करू शकतो. पण त्यासाठी त्यानं जे ऑपरेशन केलं, त्यासाठीही त्याला बक्कळ पैसा मोजावा लागला. कारण त्यासाठी निष्णात डॉक्टरांच्या टीमची गरज होती आणि काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचीही गरज होती. हे किती कष्टाचं, मेहनतीचं, खर्चाचं आणि वेळखाऊ काम असतं याची थोडीफार कल्पना आपल्याकडच्या ‘गंजेभाऊंना’ असेल. टकलावर केस उगवण्यासाठी वाट्टेल ते प्रयोग करूनही आणि वारेमाप पैसा घालवूनही डोक्यावर कोणत्याही केसांचं बी रुजलं नाही, हे कळल्यावर अनेकजण विगचा आश्रय घेतात, तर ज्यांच्याकडे पैसे  असतात, ते  आपल्या टकलावर केस इम्प्लांट करून घेतात. हे केस इम्प्लांट करण्यासाठी किती खर्च येतो आणि किती वेळ लागतो? टकलावर एक एक केसाची लावणी करताना संयम कसा सुटतो, हे त्यांना माहीत असेल.. पण डॅनचं काम त्याहूनही अवघड होतं, मात्र त्याची जिद्द त्यापेक्षा मोठी होती. अट्टहासानं या सगळ्या गोष्टी त्यानं करून घेतल्या. डॅन सांगतो, सुरुवातीपासूनच मला काहीतरी वेगळं, हटके करायचं होतं, जे आधी कोणीही केलेलं नसेल. केसांना रंग लावणं आणि केसांतून रस्ते काढण्याचे मार्ग आता मागच्या पिढीतले झाले. खूप विचार केल्यावर सोन्याच्या साखळ्या इम्प्लांट करण्याची आयडिया मला सुचली आणि मी ती अमलात आणली. इतकी हटके आयडिया लढवणारा मी आजपर्यंतचा जगातला पहिलाच माणूस आहे.आता माझी ही स्टाईलही जगभरात फेमस होईल आणि सर्व देशांतली तरुणाई माझी स्टाईल कॉपी करताना दिसेल, पण मी या स्टाईलचा जनक आहे आणि माझ्या पावलावर पाऊल टाकून अनेक जण चालताहेत, याचा मला कायम अभिमान राहील. तरुणाईनं माझी स्टाईल ढापायला माझी काही हरकत नाही, पण निदान काही दिवस, महिने तरी त्यांनी माझं हे नवेपण कायम राहू द्यावं असं मला वाटतं..’’ माध्यमांनीही डॅनची ही हटके स्टाईल उचलून धरताना त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली. न्यूयॉर्क पोस्टनंही असं करणारा डॅन हा जगातला पहिला माणूस असल्याचं म्हटलं आहे. 

फॉलोअर्सची संख्या वीस लाख!डॅननं यंदा एप्रिलमध्ये डोक्यावर ही सर्जरी करून घेतली. तोपर्यंत सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या पंधरा ते वीस हजारांच्या आसपास होती. पण त्याच्या या नव्या स्टाईलमुळे चाहत्यांची संख्या झटक्यात वीस लाखांपर्यंत गेली आणि अजूनही ती वाढतेच आहे. डॅननं आपल्या डोक्यावर सोन्याचे केसच केवळ उगवून घेतले नाहीत, तर त्याच्या तोंडात आता सोन्याचे दातही ‘उगवले’ आहेत! त्याची ही स्टाईल कॉमन होण्याच्या आधीच तुम्हीही थोडं डोकं खाजवून ठेवा, म्हणजे डॅनची कॉपी केली, असं तुम्हाला कोणी म्हणणार नाही..

टॅग्स :Mexicoमेक्सिकोSocial Mediaसोशल मीडिया