शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

या जंगलात सगळीकडे पडून आहे सोनंच सोनं, अंतराळातून दिसला नजारा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:38 IST

Gold Forest : हा फोटो स्पेस स्टेशनमधील एका अंतराळवीराने घेतला आहे. मुळात हा फोटो सोन्याच्या जंगलाचा नाही. तर अ‍ॅमेझॉनचं जंगल आणि येथील सोन्याचं बेकायदेशीर उत्खनन दाखवतो.

Gold Forest : पेरूच्या अ‍ॅमेझॉन जंगलाचे नुकतेच अंतराळातून फोटो घेण्यात आले. फोटो जेव्हा डेव्हलप केले गेले तेव्हा समजलं की, इथे तर सोन्याचा खजिना आहे. चारही बाजूने सोनंच सोनं आहे. हा फोटो स्पेस स्टेशनमधील एका अंतराळवीराने घेतला आहे. मुळात हा फोटो सोन्याच्या जंगलाचा नाही. तर अ‍ॅमेझॉनचं जंगल आणि येथील सोन्याचं बेकायदेशीर उत्खनन दाखवतो.

सोन्याच्या जंगलाचा हा फोटो पेरूच्या माद्रे-दे-दियोस प्रांतातील आहे. हे अ‍ॅमेझॉनच्या वर्षावनातील एक राज्य आहे. या पूर्ण परिसरात पाणी, दऱ्या, तलाव आणि नद्या आहेत. या फोटोत डावीकडे एक नदी दिसत आहे. त्याशिवाय जंगलामध्ये सोन्याच्या रंगाचे खड्डे बेकायदेशीर उत्खनन दाखवतात. यासाठी जंगलातील झाडे कापली जातात. सोन्याचं हे जंगल 15 किलोमीटर लांब आहे.

पेरू जगातील सहावा सोन्याचा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे. माद्रे-दे-दियोस सगळ्यात मोठं स्वतंत्र खनन केंद्र आहे. याच खननामुळे अ‍ॅमेझॉनचं जंगल कापलं जातं. सोनं काढण्यासाटी मरकरीचा वापर केला जातो. ज्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. हैराण करणारी बाब म्हणजे या जंगलातून सोनं काढणारे हजारो परिवार असंच आपलं जीवन जगतात.

फोटोत एक छोटा परिसर नुएवा दिसत आहे. जो साउदर्न इंटरओसिएनिक हायवेजवळ आहे. हा हायवे 2011 सालात बनला होता. हा एकच मार्ग आहे जो ब्राझीलला पेरूसोबत जोडतो. हा रस्ता व्यापार आणि पर्यटनासाठी तयार करण्यात आला होता. पण आता याचा वापर बेकायदेशीर उत्खनन आणि जंगल्याच्या कटाईसाठी केला जातो. 

या ठिकाणावर जेव्हा सूर्याची किरणे पडतात तेव्हा जंगलातील सोन्याची ही खाण चमकू लागते. अंतराळातून पाहिल्यावर दिसतं की, जणू काही सोन्याची नदी वाहत आहे. हे ठिकाण वरून नदीसारखं दिसतं. पण यात सोन्याच्या खाणीचे खड्डे आहेत. त्याबाजूला जंगल आहे. 

या भागात सगळ्यात मोठी समस्या ही आहे की, इथे जंगलाची कटाई सुरू आहे. ज्यामुळे अ‍ॅमेझॉन आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं नुकसान होतं. इथे पुराची देखील समस्या वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. कारण सोनं स्वच्छ करण्यासाठी मिथाइलमरकरीचा वापर होतो. याने जंगलाचं नुकसान होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स