शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

परदेशात जाताय? जाणून घ्या, पैसे वाचवण्याच्या युक्त्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 18:36 IST

‘डिनर’ऐवजी ‘लंच’ला बाहेर जा. दिवसा भपकेबाजी करायला फारसा वाव नसल्यानं दुपारचं जेवण बऱ्याचदा स्वस्त असतं.

‘व्हेन इन रोम, डू ॲज द रोमन्स डू’.. अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही जाल, तिथल्यासारखेच होऊन राहा.. अर्थात आपल्या पूर्वजांनीही ही युक्ती कधीच सांगून ठेवली आहे.. तुम्ही कुठेही प्रवासाला विशेषत: परदेश प्रवासाला गेला असाल, जात असाल, तेव्हा ही युक्ती कायमच डोक्यात ठेवलेली बरी.. असं जर केलं, तर अनेक अफलातून गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचा प्रवास अविस्मरणीय होईल आणि खाण्याचे तर असे पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील की ज्याचं नाव ते!

प्रवासाला गेलं की विशेषत: दोन गोष्टींसाठी आपला खिसा तपासून पाहावा लागतो तो म्हणजे खाणं आणि राहाणं.. पण तिथे गेल्यावर स्थानिक माणसासारखं राहून पाहा... तुमच्या खिशाला चाट तर बसणार नाहीच, शिवाय जो काही आनंद तुम्ही खिशात भरून आणाल तो वेगळाच. त्यासाठी खाण्याच्या आणि राहाण्याच्या आपल्या पूर्वकल्पना, समज आधी बाजूला काढून, त्याचं गाठोडं किमान तेवढ्या काळासाठी तरी माळ्यावर फेकून द्या. स्वस्तात आणि मस्त प्रवास करायचा म्हणजे, ‘गरिबा’सारखं, पोट आणि मन मारून राहायचं असं बिलकूल नाही. त्यासाठी आपण आपल्या अंगावर चढवलेली ‘टुरिस्ट’ची झूलही उतरवून ठेवावी लागेल. 

१- पहिली गोष्ट, तुम्ही जिथे कुठे जाणार असाल तिथे जर कोणी तुमचे मित्र-मैत्रीण, नातेवाईक, ओळखीचे राहात असतील, तर त्यांना अवश्य विचारा, इथे राहायची आणि जेवणाची चांगली सोय कुठे होऊ शकेल? हे विचारायला बिलकूल लाजू नका. तुम्हाला काही त्यांच्याकडे जाऊन राहायचं नाही. त्यांनी बोलवलं तरी तुम्हीही जाणार नाही. त्यामुळे याबाबत त्यांचा सल्ला अवश्यक घ्या. २- कुठल्याही जाहिराती पाहून तिथे जाण्याऐवजी ‘माऊथ पब्लिसिटी’चा जरुर वापर करा. अनेकांच्या तोंडून एखाद्या हॉटेलचं, एखाद्या टपरीवजा दुकानाचं, एखाद्या घरगुती जेवणाचं नाव निघालं, तर तिथे अवश्य भेट द्या.३- स्थानिक लोकांमध्ये मिसळा. तिथल्या लोकांशी मैत्री करा. ही मैत्री नंतरही तुमच्या कामात येऊ शकते.४- ‘ईटर’सारख्या वेबसाईट्स आणि ‘शेफ्सफीड’ (ChefsFeed)सारख्या ॲप्सवरही बरीच माहिती मिळू शकेल. ५- ‘डिनर’ऐवजी ‘लंच’ला बाहेर जा. दिवसा भपकेबाजी करायला फारसा वाव नसल्यानं दुपारचं जेवण बऱ्याचदा स्वस्त असतं.६- स्ट्रीट फूड चूकवू नका..

टॅग्स :Jara hatkeजरा हटके