शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

स्वच्छतेसाठी काय पण... गोव्यात 'या' ठिकाणी कचरा जमा केल्यावर मिळतं 'खत्तरनाक' गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:28 IST

समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाण्याचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोक्यात सर्वातआधी गोव्याचं नाव येतं.

समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाण्याचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोक्यात सर्वातआधी गोव्याचं नाव येतं. कारण इथे ते समुद्र किनाऱ्यासोबत इतरही अनेक गोष्टी एन्जॉय करू शकतात. मात्र गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात केला जाणारा कचरा सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

काही दिवसांपूर्वीच समुद्र किनाऱ्यावर मद्यसेवन करणाऱ्यांना २ हजार रूपयांचा दंड भरावा लागेल, असा नियमही काढण्यात आला आहे. त्यासोबतच कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक आयडियाची कल्पना समोर आणली आहे. इथे एका अशा बारची सुरूवात करण्यात आली आहे, जिथे तुम्हाला १० बीअरच्या बॉटलची झाकणे आणि वापरलेल्या सिगारेटच्या २० बट बदल्यात एक बीअर दिली जाते. 

(Image Credit : www.indiatimes.com)

कशासाठी ही सुरूवात?

गोव्यातील या बारचं नाव 'वेस्ट बार' असं आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी मरीन नावाच्या प्रायव्हेट बीच मॅनेजमेंट एजन्सीने वेस्ट बारची सुरूवात केली आहे. गोवापर्यटन मंत्रालयाने गोव्यातील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचं काम या एजन्सीकडे सोपवलं आहे. या मोहिमेची सुरूवात ३० जानेवारीला करण्यात आली आहे. बागा बीचवर झंझीबार शेकमध्ये या वेस्ट बारची सुरूवात करण्यात आली आहे. 

(Image Credit : Tera Mera Beach Facebook)

कुणी केली सुरूवात? 

दृष्टी मरीनसोबत मिळून ही संकल्पना पुढे आणणारी नोरीन वॅन होल्स्टीन सांगते की, 'लोकांना गोव्यातील दोन गोष्टी आकर्षित करतात. एक म्हणजे बीच आणि दुसरी म्हणजे बार. त्यामुळे पर्यटक ज्या गोष्टींसाठी इथे येतात त्यांना त्या द्या. कचरा जमा करण्या बदल्यात त्यांना मोफत बीअर दिली जाते. याने बीचवर कचरा होत नाही'.

वॅन होल्स्टीन सांगते की, वेस्ट बारची सुरूवात काही वर्षांपूर्वी नेदरलॅंडमध्ये केली होती. त्यानंतर ही संकल्पना जगभरात प्रसिद्ध झाली. ती सांगते की, सिगारेटचे बट, बॉटल्सची झाकणे, प्लास्टिकचे स्ट्रॉ या बदल्यातही लोकांना बीअर मिळणार आहे. 

टॅग्स :goaगोवाTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनJara hatkeजरा हटके