शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

TikTok Girl: टिकटॉकर मुलीने तोकडे कपडे घातले म्हणून शेजाऱ्यांनी असं काही केलं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 14:41 IST

शेजाऱ्यांनी जी कृती केली ते खरंच धक्कादायक होतं

TikTok Girl, Short Dress: जगात कुठे काय घडेल याचा अंदाज बांधणं हल्ली जरा कठीणच झालंय. कारण खरं पाहता, कोणी काय कपडे घालायचे हे ठरवण्याचा ज्याचा त्याला अधिकार आहे. किमान पाश्चिमात्य देशांमध्ये तरी कपडे घालण्यावर कोणतेही बंधन नाहीत. पण अमेरिकेच्या एका शहरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशात एखाद्या महिलेने किंवा मुलीने शॉर्ट स्कर्ट किंवा तुलनेने छोटे कपडे घातले तर त्याचं फारसं नवल वाटून घेतलं जात नाही. पण एक टिकटॉक स्टार मुलीने तोकडे कपडे घातल्यामुळे तिच्या शेजाऱ्यांनी जे काही केलं तर खरंच थक्क करणारं होतं. तरुणीनेदेखील या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या खूप शेअर केले जात असून व्हायरलही झाला आहे.

शेजाऱ्यांनी नक्की काय केलं?

रिपोर्टनुसार, टिकटॉकर मुलगी म्हणाली की ती अनेकदा असेच कपडे घालते आणि व्हिडिओ रेकॉर्ड करते. मात्र अलीकडेच तिच्या शेजाऱ्यांनी याबाबत गोंधळ घातला. त्यांनी त्या मुलीच्या कपड्यांबाबत थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिस आले आणि त्यांनी मुलीला सांगितलं की तिच्या कपड्यांबाबत पोलिसांकडे तक्रार आली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला कपडे बदलण्यास सांगितले. ती टिकटॉकर मुलगी खूपच तोकडे कपडे घालते आणि अंगप्रदर्शन करते, असे म्हणत शेजाऱ्यांनी मुलीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. टिकटॉकरने व्हिडिओमध्ये ट्यूब टॉप, डेनिम शॉर्ट आणि बूट घातले होते.

शेजार्‍यांप्रमाणे पोलिसांनीही मुलीला कपड्यांवरून सुनावलं...

टिकटॉकवर @1mperatix नावाच्या या युजरने सांगितले की शेजाऱ्यांना तिचा ड्रेस आवडला नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले की, शॉर्ट ड्रेस घालून मी अंगप्रदर्शन करते. त्यानंतर पोलिसांनीही तिना समजावून सांगण्यास सुरुवात केली. पण त्याचा या टिकटॉकरला राग आला. 'चांगलं आणि सुंदर दिसण्यासाठी तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे', असं तिने ठामपणे पोलिसांनाही सांगितले. तसेच, 'मी अशीच राहीन. मी चांगले कपडे घातले आहेत. ही माझी शैली आहे. त्यांना शैली आवडली नाही तरी मी असेच करत राहिन', असेही ती मुलगी म्हणाली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेTik Tok Appटिक-टॉकAmericaअमेरिकाPoliceपोलिस