मुलगी, मेहूणी आणि सासूवर नराधामाने केला बलात्कार
By Admin | Updated: September 19, 2014 16:35 IST2014-09-19T16:35:11+5:302014-09-19T16:35:11+5:30
अल्पवयीन मुलगी, मेहूणी आणि सासूवर बलात्कार करण्याचे पाशवी कृत्य एका ३० वर्षीय नराधमाने केले आहे. मडगाव येथील पोलिसठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे

मुलगी, मेहूणी आणि सासूवर नराधामाने केला बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १९ - अल्पवयीन मुलगी, मेहूणी आणि सासूवर बलात्कार करण्याचे पाशवी कृत्य एका ३० वर्षीय नराधमाने केले आहे. मडगाव येथील पोलिसठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. तसेच या नराधमावर बलात्कार आणि अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, येथील महिला पोलिस पथकाने आरोपीला अटक केले आहे.
बलात्काराचा आरोप असलेला हा इसम बेरोजगार होता. तसेच तो घरजावई होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेले सहामहिने तो स्वतःच्या अल्पवयीन मुलीवरच बलात्कार करत होता. त्याने त्याची मेहूणी आणि सासूवरहू बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या घटनेची वाच्यता केल्यास परिणाम बरे होणार नाहीत असेही त्याने पिडीत महिलांना धमकवले होते. ही तक्रार त्याच्या ६० वर्षीय सासूनेच दाखल केली असून उत्तर गोव्यातील परनेम तालुक्यात असणा-या जंगलात घेऊनजात त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचे त्याच्या सासूने पोलिसांना सांगितले आहे.