शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एकमेव असं मंदिर जिथे आहे सोंड नसलेल्या गणेशजींची मूर्ती, पाहा कुठे आहे हे मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:59 IST

Ganesh Chaturthi 2025 : देशभरात गणेशाचे अनेक मंदिरं आहेत, पण काही मंदिरं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमुळे विशेष ओळखली जातात.

Ganesh Chaturthi 2025 : भारतात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025)  हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. दहा दिवस घराघरात आणि मंडपांमध्ये बाप्पाची मूर्ती प्रस्थापित केली जाते, भजन-कीर्तन होतात आणि शेवटी विसर्जन सोहळ्याने बाप्पाला निरोप दिला जातो.

भगवान गणेश यांना विघ्नहर्ता मानलं जातं. म्हणूनच प्रत्येक शुभकार्यापूर्वी त्यांची पूजा करणे ही आपली परंपरा आहे. देशभरात गणेशाचे अनेक मंदिरं आहेत, पण काही मंदिरं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांमुळे विशेष ओळखली जातात. त्यापैकीच एक म्हणजे राजस्थानची राजधानी जयपूर येथे असलेले गढ गणेश मंदिर.

बाळ स्वरूपातील गणेशाची पूजा

गढ गणेश मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान गणेशाची मूर्ती बाळस्वरूपात (सोंड नसलेले गणेश) प्रस्थापित केलेली आहे. भक्त मानतात की येथे गणपती बाप्पा "पुरुषकृति" स्वरूपात विराजमान आहेत. हा अद्वितीय स्वरूप भक्तांसाठी आकर्षण आणि श्रद्धेचे विशेष कारण आहे.

३०० वर्षांपूर्वीचे मंदिर

गढ गणेश मंदिराची स्थापना महाराजा सवाई जयसिंह दुसरे यांनी अठराव्या शतकात केली. असे मानले जाते की जयपूर वसविण्यापूर्वी त्यांनी अश्वमेध यज्ञ केला, त्याचवेळी या मंदिराची पायाभरणी करण्यात आली. महाराजांनी मूर्ती अशी बसवली की सिटी पॅलेसच्या चंद्र महालातून दुर्बिणीनेही ती दिसावी. यावरून त्यांच्या भक्तीबरोबरच स्थापत्यकलेची दृष्टीही लक्षात येते. 

चिठ्ठी पाठवून होते नवस होतो पूर्ण

गढ़ गणेश मंदिराची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे भक्त आपली इच्छा चिठ्ठी लिहून पाठवतात. लग्न, मुलाचा जन्म, नवी नोकरी किंवा कोणतेही शुभकार्य असो सगळ्यात पहिले निमंत्रण गणेशजींनाच पाठवले जाते. मंदिराच्या पत्त्यावर दररोज शेकडो पत्रे येतात आणि ती गणेशजींच्या चरणी अर्पण केली जातात. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

३६५ पायऱ्या आणि सुंदर दृश्य

मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी ३६५ पायऱ्या चढाव्या लागतात, ज्या वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक मानल्या जातात. ही चढाई थोडी कष्टदायक असली तरी मंदिरात पोहोचल्यावर मिळणारा शांत अनुभव थकवा घालवून टाकतो.

टॅग्स :Ganesh Chaturthiगणेश चतुर्थीInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके