आकाशपाळण्यात अडकलेल्या चिमु्कल्यांचा मृत्यूशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:43 IST2017-10-03T15:37:41+5:302017-10-03T15:43:14+5:30
नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका ठिकाणी आकाशपाळण्याच्या चाकात दोन लहान मुलं अडकली होती. त्यांना वाचवण्यासाठी एका व्य़क्तीने शर्थीने प्रयत्न केले मात्र ....

आकाशपाळण्यात अडकलेल्या चिमु्कल्यांचा मृत्यूशी खेळ
जत्रेत गेल्यावर आकाशपाळण्यात बसण्याचा कोणालाच मोह आवरत नाही. मात्र कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे आणि अतिउत्साहामुळे हा मोह आपल्याच जिव्हारी लागू शकतो. असाच एक प्रकार घडला नॉर्थ कॅरोलिनामध्ये. तिथे एका ठिकाणी आकाशपाळण्याच्या चाकात दोन लहान मुलं अडकली होती. त्यांना वाचवण्यासाठी एका व्य़क्तीने शर्थीने प्रयत्न केले. मात्र त्यांना वाचवताना त्याचाच तोल जाऊन तो खाली आदळला.
नॉर्थ कॅरेलिनोच्या एका जत्रेत आकाशपाळण्यात बसलेली दोन लहान मुलं त्यातल्या चाकात अडकली. एवढ्या उंचावर दोन लहान मुलं अडकल्याचे पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्या अडकलेल्या मुलांमध्ये एक ५ वर्षांचा आणि दुसरा ७ वर्षांचा मुलगा होता. त्यांचा जीव वाचवणे फार गरजेचं होतं. त्यासाठी आकाशपाळण्याच्या मालकाने पुढाकार घेतला आणि त्यांना वाचवू लागला. एवढ्या उंचीवर अडकल्याने मुलं फार घाबरली होती. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. उडी मारुन जीव वाचवण्याचा प्रश्नच येत नव्हता. ते घाबरलेले दोघं आम्हाला मरायचं नाहीये, आम्हाला वाचवा अशी,आर्त साद घालत होते. खाली उभी असलेली आईही जीवाच्या आकांताने रडत होती. आकाशपाळण्याचा मालक त्या दोन जीवांना वाचवण्याचे प्रयत्न करत असताना खाली कोसळला. आकाशपाळण्यांचा डब्यांचा त्याला जबर माल लागला. त्यामुळे पुन्हा उठून त्या बाळांना वाचवण्याचा त्राणच त्याचात उरला नाही. त्यामुळे त्या बालकांना आता वाचवणार कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. मग आईने स्वत: प्रयत्न करायला सुरुवात केली. त्या माऊलीने हार पत्कारली नाही. ती स्वत: त्या आकाशपाळण्यावर चढली आणि आपल्या मुलांना वाचवू लागली.
हा प्रसंग तेथील एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडीओत कैद केला. तो व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर अपलोड होताच व्हायरल झाला. सप्टेंबरमध्ये घडलेल्या या प्रकाराच्या व्हिडीओने युट्यूबवर ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत.