शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माणसाने बनविले माश्यांना ‘समलिंगी’, वाचा नेमके काय घडले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:38 IST

पुरुषाचे पुरुषांशी संबंध आणि महिलेचा महिलेशी संबंध, हा सध्या जगभर चर्चेचा विषय. अनेक देशांमध्ये हे संबंध उघडपणे ठेवले जाऊ ...

पुरुषाचे पुरुषांशी संबंध आणि महिलेचा महिलेशी संबंध, हा सध्या जगभर चर्चेचा विषय. अनेक देशांमध्ये हे संबंध उघडपणे ठेवले जाऊ लागले आहेत. काही देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे तर कुठे हा गंभीर गुन्हा असल्याने कठोर शिक्षा ठोठावली जाते. भारतातही याचे लोण पोहोचले आहे, परंतु सरकारने या विवाहांना अद्याप कायदेशीर मान्यता दिलेली नाही. मानवाचा हा गुण माश्यांनाही लागला की काय, असे वाटावे अशी स्थिती समोर आली आहे.  

या सवयीमागे कोण?  मानवाने हा निर्णय स्वत: घेतला आहे. परंतु, माश्यांनी हे काही स्वेच्छेने केलेले नाही. मानवी कृतीमुळे त्यांना हे करणे भाग पडत आहे. या पृथ्वीतलावर मानवाने केलेल्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम किटकांवरही होऊ लागला आहे. यामुळे काहींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे तर काहींच्या सवयी बदलून गेल्या आहेत. 

नेमके काय घडले? जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिकल इकोलॉजीच्या संशोधकांनी माश्यांबाबत केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, नर आणि मादी माशी आता एकमेकांमध्ये फरक समजू शकत नाहीत. त्यामुळेच नकळतपणे मिलनासाठी नर नराकडे जात आहे आणि मादी मादीकडे जात आहे. संशोधनात आढळले की, १० नर माशींपैकी फक्त ७ माश्या मिलनासाठी मादी माशीकडे जात आहेत, तर तीन नर माशा नर माशीकडे जात आहेत.

शास्त्रीय कारण काय? संशोधनानुसार, वातावरणातील ओझोनचे प्रदूषण वाढल्याने माश्यांवर दुष्परिणाम होत आहे. या प्रदूषणामुळे माश्यांमध्ये ‘फेरोमोन्स’ नावाचे संप्रेरक (हार्मोन) तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नर आणि मादी हा फरक ओळखण्यात अडचणी येत आहेत. प्रदूषणामुळे आता या फ्रूट फ्लाय म्हणजेच फळांवर घुटमळणाऱ्या माश्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण बनले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके