शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात नशीब! शेतात खोदकाम करत असताना शेतकऱ्याला सापडलं 33 हजार कोटींचं सोनं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:10 IST

52 वर्षीय एका शेतकऱ्यासोबत एक घटना घडली. ही व्यक्ती शेतात खोदकाम करत असताना त्याचं नशीब पालटलं.

कधीतरी आपल्याला एखादा मोठा खजिना सापडावा अशी काही लोकांची मनोमन इच्छा असते. पण ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही. पण कधी कधी अचानक एखाद्याच्या हाती मोठा खजिना लागतो. तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. पण त्याचा आनंद फार जास्त वेळ टिकू शकला नाही.

फ्रान्समधील 52 वर्षीय एका शेतकऱ्यासोबत एक घटना घडली. ही व्यक्ती शेतात खोदकाम करत असताना त्याचं नशीब पालटलं. त्याला शेतात काम करत असताना मिशेल ड्यूपोंट याना किती रूपयांचा खजिना सापडला हे वाचून तुमची झोप उडेल. त्याना तब्बल 4 अरब डॉलर म्हणजे 33, 000 कोटी रूपयांचं सोनं सापडलं.

ही घटना फ्रान्सच्या औवने भागात घडली. शेतकरी मिशेल ड्यूपोंट त्याच्या जमिनीची सामान्य टेस्ट करत होता. तेव्हाच त्याला काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. जेव्हा त्यानं जमीन आणखी खोदली तेव्हा त्याच्या हाती सोन्याचा एक तुकडा लागला. शेतकऱ्यानं खोदणं सुरू ठेवलं आणि त्याला सोन्याचे तुकडे सापडत गेले. 

नंतर एक्सपर्टनी अंदाज लावला की, त्याच्या जमिनीखाली साधारण 150 टन सोनं आहे. या खजिन्याची किंमत जवळपास 4 अरब डॉलर व्यक्ती करण्यात आली. ज्यामुळे ड्यूपोंट रातोरात अब्जाधीश झाला असता. 

ड्यूपोंटनं मीडियासोबत बोलताना सांगितलं की, मी फक्त माझ्या जमिनीची रूटीन टेस्ट करत होतो. तेव्हाच मला मातीखाली चमकदार वस्तू दिसली. मी जरा आणखी खोदल्यावर माझ्या लक्षात आलं की, मी काय बघतोय. जमिनीखाली सोनंच सोनं होतं.

पण लवकर शेतकऱ्याचा हिरमोड झाला. जेव्हा स्थानिक प्रशासनाला समजलं की, शेतकऱ्याच्या शेतात सोनं सापडलं, तेव्हा त्यांनी खोदकाम करण्यास मनाई केली. अधिकारी म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या खोदकामासाठी त्याला टेक्निक आणि पर्यावरणावर त्याचा काय प्रभाव पडेल हे बघणं महत्वाचं आहे. त्याशिवाय पर्यावरण कार्यकर्त्यांनी सुद्धा खोदकामाला विरोध केला. 

ड्यूपोंटनं सांगितलं की, तो निराश आहे. पण त्यानी हेही मान्य केलं की, अधिकाऱ्यांची सतर्कता सुद्धा त्याला समजते. सध्या तो फक्त वाट बघत आहे की, त्याला त्याचा खजिना काढण्याची परवानगी मिळेल की नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFranceफ्रान्स