शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, इथे जेम्स बॉन्ड काय त्याचा पप्पाही पोहोचू शकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 16:40 IST

जर तुम्ही गुगलवर जाऊन जगातलं सर्वात मजबूत आणि सुरक्षित ठिकाण कोणतं? असं सर्च कराल तर तुम्हाला उत्तर मिळेल की, फोर्ट नॉक्स.

Source: Businessinsider

जर तुम्ही गुगलवर जाऊन जगातलं सर्वात मजबूत आणि सुरक्षित ठिकाण कोणतं? असं सर्च कराल तर तुम्हाला उत्तर मिळेल की, फोर्ट नॉक्स. ही अमेरिकेची ती तिजोरी आहे, ज्यात सगळं सोनं ठेवण्यात आलं आहे. इथे साधारण ५० हजार टन सोनं ठेवण्यात आलं आहे. हे जगभरातील सोन्याचं २.५ टक्के सोनं आहे.

या सोन्याची किंमत १२, ६०००० कोटी रूपये इतकी सांगितली जाते. त्यामुळे अर्थातच इथे सुरक्षा अशी आहे की, इथे पक्षीही घुसू शकत नाही. या कारणानेच या ठिकाणाला पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित तिजोरी म्हटलं जातं. १९३६ मध्ये तयार करण्यात आलेली ही बिल्डींग कोणत्याही प्रकारचं हल्ला परतवून लावण्यासाठी सक्षम आहे. 

३० हजार सैनिक तैनात

फोर्ट नॉक्समध्ये अमेरिकेचा खजिना तर ठेवला आहेच सोबतच हे ठिकाण एक मिलिट्री बेसही आहे. याच्या सरक्षेसाठी ३० हजार जवान तैनात आहेत. अमेरिका ज्या ज्या शस्त्रास्त्रांचा युद्धात वापर करते, ती सगळी शस्त्रास्त्रे या इमारतीच्या सुरक्षेसाठीही आहेत. चारही बाजूंनी ४ भींती उभारण्यात आल्या आहेत. यातील दोनमध्ये वीजेचा करंट आहे. इतर दोन इमारतींना अमेरिकन जवान गार्ड करतात. सोबतच इथे आजूबाजूला लॅन्ड माइन्सही लावण्यात आले आहेत. 

रोबोट्सचाही होतो वापर

जर कुणी यातून मार्ग काढून जिवंत राहिलं तरी कॅमेराच्या नजरेतून त्यांचं वाचणं कठीण आहे. इथे कॅमेरांचां कडक बंदोबस्त आहे. त्यासोबतच इथे सुरक्षेसाठी रोबोट्सचाही वापर केला जातो. समजा कुणी इमारतीपर्यंत पोहोचलं तर त्याचा सामना जवान आणि कॅमेरांशी होईल. जर यांना चुकवून कुणी आणखी पुढे गेलं तर त्याच्यासमोर ४ फूट उंच भींत उभी राहणार. ही भींत ७५० टन ग्रेनाइट आणि स्टीलपासून तयार आहे. ही इमारत उडवली जाईल. 

२२ टनाचा तिजोरीचा दरवाजा

वेगवेगळ्या सिनेमात तुम्ही अनेक तिजोरी पाहिल्या असतील. पण ही तिजोरी खरंच त्याहून वेगळी आहे. या तिजोरीच्या दरवाज्याचं वजन २२ टन इतकं आहे. हा दरवाजा उघडण्यासाठी अर्थातच पासवर्डची गरज असते. हे पासवर्ड वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असतात. काही लोक सोडता कुणालाच पूर्ण कोड माहिती नसतो. 

Source: thingsthatsuck.info

इतकेच नाही तर या मोठ्या तिजोरीमध्ये असलेल्या छोट्या छोट्या लॉकर्समध्ये सोनं ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी पासवर्डची गरज पडेल. समजा कुणी आत शिरलं आणि त्याने सोनं मिळवलं तरी तेवढ्या वेळात कुणीतरी आत गेल्याची बातमी पोहोचेल. तेव्हा बाहेर सैन्याची फौज उभी असेल. 

म्हणजे बघा ना वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण जेम्स बॉन्डला कुठच्या कुठे जाताना बघतो. तो कुठेही काहीही करून शिरतो. पण इतक्या सुरक्षेच्या ठिकाणी तर जेम्स बॉन्डचा पप्पाही जाऊ शकणार नाही. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाGoldसोनं